- प्रकाश लिमये
BJP Politics : मिरा भाईंदर महनागरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने 61 माजी नगरसेवकांपैकी 20 माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र उमेदवारी नाकारण्याचा पक्षाचा निर्णय न रुचलेल्या 20 पैकी 13 माजी नगरसेवकांनी बंड करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. आता या बंडखोरी करणार्या माजी नगरसेवकांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.
पक्षाकडून आयत्यावेळी उमेदवारी मिळाल्याने उमेदवारी अर्ज दखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड धावपळ झाली होती. त्यामुळे बंडखोरी नेमकी किती प्रमाणात झाली याचा अंदाज खुद्द नेत्यांनाही आलेला नव्हता. मात्र उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांची अधिकृत यादी बुधवारी (ता.31) सकाळी प्रशासनाकडून जाहीर झाल्यानंतर बंडखोरांची संख्या बरीच असल्याचे दिसून आले. त्यात भाजपच्या बंडखोरांची संख्या अधिक आहे.
भाजपने यंदा 20 माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. त्यांच्या जागी नविन चेहरे तसेच युवा वर्गाला संधी देण्यात आली आहे. भाजपच्या (BJP) युवा मोर्चाचे 10 पदाधिकारी निवडणूक लढवणार आहेत. मात्र उमेदवारी नाकारली जाताच 20 पैकी 13 माजी नगरसेवकांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यात काही वरिष्ठ नगरसेवकांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त निवडणूक लढवू इच्छिणार्या भाजपच्या काही प्रमुख पदाधिकार्यांनीही बंडखोरी केली आहे.
भाजप-शिवसेना युती न झाल्याने भाजपला अनेक ठिकाणी शिवसेनेचे (Shivsena) कडवे आव्हान असणार आहे. त्यातच बंडखोर रिंगणात राहिले तर भाजपची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. महापलिकेत एकहाती सत्ता स्थापन करण्याचा दावा भाजपने केला आहे. मात्र या मार्गात बंडखोर अडथळा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बंडखोरांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर उभे राहिले आहे.
बंडखोरीची लागण काही प्रमाणात काँग्रेसलाही (Congress) लागली आहे. काँग्रेसने 12 पैकी 4 माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली आहे. या माजी नगरसेवकांनी बंडखोरी केलेली नाही. मात्र उमेदवारी न मिळालेले पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी व जिल्हा प्रवक्ता प्रकाश नागणे यांच्यासह काही महत्त्वाच्या पदाधिकार्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.