Raj Thackeray, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Best Election: 'बेस्ट'च्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना चितपट करणाऱ्या शशांक राव अन् लाडांना भाजपनं दिलं 'हे' मोठं गिफ्ट

Best Employees Credit Society Election : बेस्टच्या निवडणुकीतील पराभव हा मुंबई महापालिका निवडणुकांआधीच ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता गमावली.

Sudesh Mitkar

Pune News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आल्याने दी बेस्ट दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणूक(Best Employees Credit Society Election) प्रतिष्ठेची बनली होती. राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीचा निकाल मंगळवारी रात्री उशिरा लागला असून यात ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला.

बेस्टच्या निवडणुकीतील पराभव हा मुंबई महापालिका निवडणुकांआधीच ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता गमावली. प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत शशांकराव पॅनलचे सर्वाधिक 12 उमेदवार विजयी तर प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या ( महायुती ) सहकार समृद्धी पॅनलचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत.

आम्ही या विजयानंतर शशांकराव आणि प्रसाद लाड यांना भाजपने (BJP) मोठं गिफ्ट दिलं आहे. याबाबतची घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. ते म्हणाले, या निवडणुकीमध्ये आम्ही भाजप राजकीय पक्ष म्हणून उतरलं नव्हतो. कारण ही निवडणूक बेस्टवर प्रेम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती. मात्र याचं राजकीय करण मनसे आणि उभाटाने केलं.

प्रत्येक गोष्टीचा राजकीय करण करण याचाच फळ त्यांना मिळालं आणि हाती भोपळा आला. 0 + 0 हा शून्यच, हे मी आधीही म्हणालो होतो. आज भोपळा हातात आला. मुंबईचा विजय झाला, मुंबईकरांचा विजय झाला, मराठीचा विजय झाला, कामगारांचा विजय झाला आणि भाजपचा विजय झाला असं आशिष शेलार म्हणाले.

मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून मी आज जाहीर करतो की मुंबई महानगरपालिकेच्या स्टार प्रचारकांची मोठी यादी जाहीर होईलच पण स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी आज जाहीर करत आहे.

या दोघांनीच बेस्टच्या निवडणुकीत या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाला मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे आहे हे दाखवून दिले. शोलेत जसे होते तसे मुंबई भाजपच्या निवडणुकीत जय-वीरूची जोडी म्हणून मी शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव घोषित करतो.

यावेळी महायुती सरकारमधील मंत्री मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. ते म्हणाले, मी या दोन्ही पक्षांना सांगतो आधी या दोघांशी निपटा आणि मग माझ्याकडे आणि देवेंद्र फडणवीसांकडे या असं आव्हानही त्यांनी दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT