BJP RSS VS Janhitwadi  sarkarnama
मुंबई

Dombivli Politics : भरपावसात राजकीय वातावरण तापले; भाजप, आरएसएस विरोधात सभा, पोलिसांचा हस्ताक्षेप

BJP RSS VS Janhitwadi : डोंबिवलीमध्ये भाजप आणि आरएसएस विरोधात सभा आयोजित करण्यात आला आहे. त्यावरून राजकीय तणाव डोंबिवलीमध्ये निर्माण झाला आहे.

शर्मिला वाळुंज

Dombivli News : आगामी पालिका निवडणूकीच्या तोंडावर पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला जोर आला आहे. त्यासोबतच पक्षाची ताकद दाखवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपली ताकद दाखवित राजकीय वातावरण तंग करण्यास सुरुवात केली आहे. साडी प्रकरणावरुन भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील वातावरण गरम असतानाच आता आंबेडकर जनहितवादी संघटना आणि भाजपा यांच्यात रविवारी वाद झाला.

सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात सभा आयोजित केल्याने भाजपा आक्रमक झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केले.

डोंबिवलीत आंबेडकर जनहितवादी संघटना आणि कम्युनिस्ट विचार मंच यांनी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात रविवारी रामनगर परिसरात सभा आयोजित केली होती. या सभेला विरोध करण्यासाठी भाजपचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी सभेच्या ठिकाणी जमले. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण बनले होते.

कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना गेट जवळ अडवले. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे बराच वेळ त्या ठिकाणी उभे होते आणि आम्हाला आत आत जाऊ द्या, अशी पोलिसांना विनंती करत होते मात्र पोलिसांनी त्यांना आत सोडले नाही.

दरम्यान पत्रकारांना ही माहिती मिळताच पत्रकारही तिथे पोहोचले, मात्र पोलिसांनी पत्रकारांना सुद्धा आत मध्ये जाण्यास परवानगी दिली नाही. अर्धा पाऊण तासानंतर पोलिसांनी आंबेडकर जनहितवादी संघटना आणि कम्युनिस्ट विचार मंच यांच्या कार्यकर्त्यांना आणि सभेतील जमलेल्या काही लोकांना बाहेर जाण्यास वाट करून दिली. आणि सदर ठिकाणी कुठलाही गोंधळ होऊ नये याची काळजी घेतली. यानंतर घटनास्थळाहून भाजपचे कार्यकर्तेही निघून गेले.

सभेसाठी 20 ते 25 जण जमा झाली होती अशी प्राथमिक माहिती असून सभा झाली की नाही झाली यावर कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान सदर सभेला पोलिसांची परवानगी होती का हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. बाबत पोलिसांना नक्की काय प्रकार घडला हे विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT