Chhagan Bhujbal : पावसाने मोठे नुकसान, मुंबई दौरा रद्द करत भुजबळांची येवल्याकडे धाव

Nashik rain damage : मंत्री छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याच्या पूरपरिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी मुंबईचा दौरा करत येवला गाठले आहे. तेथून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देखील सूचना केल्या आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २८) पावसाने तुफान बॅटिंग केली. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत अतिवृष्टी झाली. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला तालुक्यातही पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान विभागाच्या सूचनेनुसार दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे

मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपला मुंबई दौरा रद्द करत तातडीने येवला मतदारसंघात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते रवाना झाले. येवला तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना तातडीने मदतकार्य मिळण्याच्या दृष्टीने मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्या त्या गावात आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानुसार सर्व गावामध्ये कार्यकर्ते पोहचून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

भुजबळांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दूरध्वनी द्वारे संपर्क करत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहे. जिल्ह्यातील पूरस्थितीवर प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसील, पोलिस स्टेशन कार्यालयात तातडीने नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावे. पूरपरिस्थितीत अडकलेले नागरिक तसेच जनावरे सुरक्षित स्थळी हलवावे असे निर्देश भुजबळांनी दिले.

Chhagan Bhujbal
Raj Thackeray Leader : राज ठाकरेंच्या ढाण्या वाघाने भाजपला तडातडा तोडलं, सगळे बघतच राहिले

मदत कक्षाचे दूरध्वनी क्रमांक सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रात जनतेसाठी तात्काळ प्रसिद्ध करावेत पूर परिस्थितीत काही तात्पुरती बेटे निर्माण झालेली आहे. अशा ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना तात्काळ सुटका करावीत. आवश्यक त्या ठिकाणी एनडीआरएफ किंवा एसडीआरएफ पथकांची मदत घ्यावी अशा सूचना भुजबळांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

तसेच पूरग्रस्त भागात बेघर झालेल्या कुटुंबांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मोफत धान्य तसेच मदतीची रक्कम तात्काळ वाटप सुरू करावे. पूर परिस्थितीने बाधित झालेल्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरित करावे. ज्या ठिकाणी जीवित हानी पशुहानी झालेली आहे, त्या ठिकाणी तात्काळ मदत देण्याची कार्यवाही सुरू करावी जखमी व्यक्तींना सुद्धा सुरक्षित ठिकाणी हलवावे अशा सूचना केल्या आहे.

Chhagan Bhujbal
Nashik politics: मुसळधार पावसाने चारही मंत्र्यांची उडवली झोप! भुजबळांच्या मतदारसंघात प्रचंड नुकसान

त्याचबरोबर शेती पिकांचे, घरांचे तसेच पायाभूत सुविधांचे जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तात्काळ सुरू करण्यात यावेत. सर्व शासकीय हॉस्पिटल या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा,औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध ठेवावा. जीवनावश्यक सेवा, दूरध्वनी सेवा, खराब झालेले रस्ते, विद्युत सेवा तात्काळ पूर्ववत व्यवस्थित सुरू करणे बद्दल संबंधित विभागांनी कार्यवाही करावी. आपत्कालीन सेवेमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या रजा तात्काळ रद्द कराव्यात. सोमवारी लहान मुलांच्या शाळा तसेच अंगणवाड्या यांना आवश्यकता असल्यास सुट्ट्या जाहीर कराव्यात तसेच जिल्ह्यातील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा धरणांचा जिल्हा असल्यामुळे धरणांमधील विसर्ग त्यामधून होणारा पाण्याचा प्रवाह व त्यामुळे बाधित होणारी गावे काठावरील कुटुंबे यांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे असेही निर्देश त्यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com