BMC Result Sarkarnama
मुंबई

Mumbai Result : 'भाजप 90, शिंदे 40 आणि ठाकरे...', मुंबई महापालिकेत हीच आकडेवारी; मोठ्या मंत्र्याने वर्तवला अंदाज

BJP Mumbai Pune Municipal Corporation : माझ्या भाकितांचा इतिहास आहे की एखाद अर्धा निकाल इकडे तिकडे होतो मात्र बहुतांश भाकीत खरी ठरतात, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

Sudesh Mitkar

Pune News : राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान झाले तसेच उद्या मतमोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच नेमकी कोणाची सत्ता येणार याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू टक्कार देणार की भाजप बाजी मारणार याची चर्चा सुरू असताना भाजप मंत्र्याने मोठा दावा केला आहे.

मुंबई महापालिकेचे भाकीत वर्तवायचं झालं तर 90 जागा या भाजपाला मिळतील तर 40 जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील, असा माझा अंदाज आहे. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये 165 पैकी 115 जागा भाजप निश्चितपणे जिंकणार आहे, असा अंदाज पाटील यांनी वर्तवत. ठाकरेंना मुंबईत सत्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मुंबई, पुणे यांच्यासह सहा नगरपालिकेच्या निकालाबाबत मी आकडेवारी तुम्हाला देऊ शकतो. माझ्या भाकितांचा इतिहास आहे की एखाद अर्धा निकाल इकडे तिकडे होतो मात्र बहुतांश भाकीत खरी ठरतात.

यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये देखील चंद्रकांत पाटील यांनी काही जागांच्या बाबत भाकीत वर्तवलं होतं आणि काही ठिकाणी त्यांचा भाकित खरे देखील ठरला आहे. यंदाच्या पुणे महापालिका निवडणुकीमध्ये यापूर्वी देखील चंद्रकांत पाटील यांनी एक भाकीत केला आहे.

त्यानुसार प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजपचा उमेदवार हा राज्यातील सर्वाधिक मतदान घेऊन विजयी होईल असं चंद्रकांत पाटील यांनी भाकीत वर्तवला आहे. या ठिकाणी भाजपने उमेदवारी नाकारल्याने अमोल बालवडकर हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या जागेबाबत हे भाकीत पाटील यांनी वर्तवला आहे. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमधील गणित सांगितले आहेत.

65 पैकी 48 जागा मिळवू

कोल्हापूरमध्ये 62 जागा भाजप जिंकेल असं मला वाटतं. तसेच सांगलीमध्ये 55 आणि इचलकरंजी मध्ये तर भाजपचा मोठा विजय होणार असून 65 पैकी 48 जागांवर आमचे उमेदवार विजयी होतील असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT