Raj Thackeray |
Raj Thackeray | 
मुंबई

Andheri By elelction : भाजपने अंधेरीची निवडणूक लढवू नये; राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

अनुराधा धावडे

Raj Thackeray Latest news update| मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने अंधेरीची निवडणूक लढवू नये अशी विनंती केली आहे. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आमदार झाल्यास रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहीलं आहे की, ''आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व ) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोट- निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यान कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे . आपणही तसं करावं असं मला माझे मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.'' अशी विंनती त्यांनी पत्रातून केली आहे.

दरम्यान, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरुन मुंबईच राजकारण तापलं असतानाच राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर आज पुन्हा भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे अंधेरीच्या या निवडणूकीत राज ठाकरे हे भाजपला आतून पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. पण आज अचानक त्यांनी या निवडणूकीबाबत आपली भूमिका मांडल्याने आता या सर्व चर्चांवर पडदा पडल्याचे म्हणता येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT