मुंबई: अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारला कालपासून सुरुवात झाली आहे. पोटनिवडणुकीवरुन मुंबईच राजकारण तापलं असतानाच दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर आज पुन्हा भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीगाठींमुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
या निवडणूकीत उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोघांनीही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कालपासून प्रचाराला सुरुवात केली. दोन्ही उमेदवारांनी दिवसभर मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या, नागरिकांकडूनही त्यांच उत्सफूर्त स्वागत करण्यात आलं. पण एकीकडे हे सुरु असताना राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत जवळपास 20 मिनिटे चर्चाही केली.
याभेटीत दोघांमध्ये अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पण भेटीत अजून कोणत्या विषयावर चर्चा झाली ते मात्र गुलदस्त्यात आहे. पण या भेटीगाठींनंतर आता राज ठाकरे अंधेरीत प्रचार करणार का? मनसे भाजपच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देणार का? याबाबत असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.
दरम्यान राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही बराचवेळ चर्चा झाल्याचे सांगितले जाते. त्यासोबतच मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर चोवीस तासातच त्यांनी आशिष शेलारांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अंधेरी पोटनिवडणुकीबाबत आणि पक्षाचा निरोप देण्यासाठी शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची आहे.
मात्र, भाजप नेत्यांच्या या भेटीगाठींंवर राज यांनी अजून कोणतेही पाऊल उचलले नाही. पण अंधेरीच्या या निवडणूकीत राज ठाकरे हे भाजपला आतून पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर शिंदे गट आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठीमधून राज ठाकरे अंधेरीचा गेम पालटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.