Chandrakant Patil News
Chandrakant Patil News Sarkarnama
मुंबई

चंद्रकांतदादा म्हणतात, आम्ही गोट्या खेळत नाही, जुळवाजुळव करतोय!

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप (BJP) व राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्यालाच सर्वाधिक नगरपालिका मिळाल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादीकडून (NCP) काठावर संख्याबळ असलेल्या नगरपालिकांमध्येही जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आम्हीही गोट्या खेळत नाही, असं स्पष्ट करत आणखी काही नगरपालिकांमध्ये भाजपकडून जुळवाजुळव सुरू असल्याचे सांगितेल. (Chandrakant Patil News)

पाटील यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, नगरपंचायतीच्या निवडणुकीत (Nagar Palika Election) एकट्याने लढून आमची 20 नगरपालिकांत सत्ता आली. तर तीन पक्षांना मिळून 32 मिळाल्या आहेत. आमच्या दादांचे म्हणणे आहे की, याव्यतिरिक्त उरलेल्या 54 ठिकाणी जुळवाजुळव करत आहोत. आम्हीही गोट्या खेळत नाही. आम्ही जुळवाजुळव करू. 15 ठिकाणी जुळावजुळव पुर्ण झाली आहे. गट फॉर्मेशनपर्यंत झाले आहेत. त्यामुळे आम्ही 35 वर गेलो, असे चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं.

नगरपंचायतीच्या निवडणुकांत स्थानिक मुद्दे असतात. मतदारसंघ छोटे असतात. पैशांचा वापर होतो. पोलिसांचा वापर केला जातो. तिथे आम्ही न घाबरता, एवढ्या जागा मिळवल्या. निवडणूक जशी मोठी होते, तशी ती मेरिटवर होते. विधानसभा आणि लोकसभेला काय होईल, हे बघा, असं आव्हानही चंद्रकात पाटील यांनी विरोधकांना दिले.

महाविकास आघाडीकडून (MahaVikas Aghadi) भाजपला वेगवेगळ्या मुद्यांमध्येच अडकवून ठेवले जातेय का, या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले, आम्हाला अडकवण्याइतके आम्ही छोटे नाही. आमची यंत्रणा खूप मोठी आहे. आम्ही एकाचवेळी विद्यापीठ कायद्यावरही आंदोलन करतो. नाना पटोले, पेंग्विन, मुंबई महापालिकेच्याबाबतही आंदोलन करत आहोत. आमची ताकद खूप मोठी आहे, त्याची काळजी करू नये.

काँग्रेसने नाना पटोलेंची तपासणी करावी

नाना पटोलेंच्या (Nana Patole) वक्तव्याचाही पाटील यांनी समाचार घेतला. काँग्रेस (Congress) पक्षाने नाना पटोलेंची तपासणी करावी लागेल, शारीरिक, मानसिक करावी लागेल. देशाच्या सर्वोच्च नेत्यावर काही बोलले तरी प्रसिध्दी मिळते, असे त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वानेच ठरवले आहे. म्हणून या सगळ्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी पटोलेंचा निषेध केला जात आहे. राजकारणाचा स्तर किती घसरावा, आपली भाषा खालच्या पातळीवर न्यावी, याचे उदादरण पटोले ठेवत आहेत. काँग्रेसने याचा विचार करायला हवा, अशी टीका पाटील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT