खळखट्याक 'स्टाईल'च्या रुपाली पाटलांना थेट अजितदादांनीच दिले शिस्तीचे धडे

मनसे सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या रुपाली पाटील यांनी खळखट्याक स्टाईल कायम ठेवणार असल्याचे म्हटले आहे.
Ajit Pawar, Rupali Patil
Ajit Pawar, Rupali PatilSarkarnama
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) खळखट्याक 'स्टाईल'च्या राजकारणात वाढलेल्या माजी नगरसेविका रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तोच आक्रमकपणा कायम राहील, असा इशारा विरोधकांना दिला होता. पण त्यांची ही मनसे स्टाईल राष्ट्रवादीत चालणार नाही, असे राष्ट्रवादीच्या शिस्टीचे धडेच राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्याचे समजते.

रुपाली पाटील या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. मनसेची स्थानपा झाल्यापासून राज ठाकरे यांच्याशी त्यांची जवळीक होती. मनसे स्टाईलने विरोधकांना टीकेचा भडिमार करणं, पक्षाच्या कोणत्याही आंदोलनात हिरीरीने सहभागी होणं, इतर सामाजिक विषयांमध्ये आक्रमकपणे भूमिका मांडण्यासाठी त्या सतत उत्सुक असतात. त्यामुळे राष्ट्रवादीतही (NCP) त्यांचा हा आक्रमक बाणा कायम राहील, असं त्यांनी सांगितलं आहे.

Ajit Pawar, Rupali Patil
राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवाराविरोधात शिवसेना मैदानात

पाटील यांच्या या आक्रमकपणाला काहीशी मुरड घालावी लागण्याची शक्यता आहे. कारण खुद्द अजितदादांनीच त्यांना राष्ट्रवादीच्या शिस्तीचे धडे दिले. लोकांशी कसे बोलायचे इथपासून ते आक्रमकपणा कुठे आणि कसा दाखवायचे, हे पटवून देत अजितदादांनी रुपाली पाटलांना नव्या राजकीय इनिंगसाठी महत्वाच्या टीप्स दिल्या. या शिकवणीनंतर रुपाली पाटलांकडे नवी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. मात्र, पाटील खरोखरीच दादांची शिकवण मनावर घेणार का, हा प्रश्न आहे.

रुपाली पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि थेट अजितदादांच्या गोटात शिरल्या. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषत: अजितदादांवरील आरोपांचा समाचार घेत, त्या सोशल मीडियातून आक्रमक दिसत आहे. दुसरीकडे, रुपाली पाटलांची ही स्टाईल अजितदादांच्या पचनी पडणार का, अशी शंका होती.

Ajit Pawar, Rupali Patil
चर्चा तर होणारच! या देशाच्या पंतप्रधानांनी कोरोना नियमांमुळं स्वत:चंच लग्न केलं रद्द...

अशातच पुण्यात बैठकानिमित्त आलेल्या अजित पवार आणि रुपाली पाटील यांच्यात शनिवारी सायंकाळी भेट झाली. तेव्हा बदलत्या राजकीय स्थिती लोकांशी कसा संवाद ठेवायचा, आपल्या बोलण्यातून कोणताही घटक दुखावला जाणार नाही आणि त्याचे परिणाम आपल्या वाट्याला येणार नाहीत, याकडे लक्ष देण्याबाबत अजितदादांनी रुपाली पाटील सूचना केल्याचे सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com