Ashish Shelar, Chandrashekhar Bawankule sarkarnama
मुंबई

`सरकारनामा`चे वृत्त खरे ठरले; भाजप प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे; शेलारांकडे मुंबई

Chandrashekhar Bawankule : प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीसाठी ओबीसी चेहरा असावा असा मतप्रवाह भाजपमध्ये होता. त्यामुळे बावनकुळे यांचे नाव सर्वाधित चर्चेत होते.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपने त्यांच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तर आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर आता ज्या जागी इतर व्यक्तीस जबाबदारी देण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जागी ओबीसी चेहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे किंवा राम शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता होती, तर मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या जागी पुन्हा आशिष शेलार यांच्याकडे जबाबदारी द्यायच्या हालचाली सुरू होत्या.

चंद्रकांत पाटील यांची टर्म डिसेंबर अखेर संपत आहे. त्यांची टर्म संपण्याआधीच नवीन प्रदेश अध्यक्ष निवडला गेला आहे. भाजपा ओबीसी समाजाची राजकीय मूठ पुन्हा नव्याने बांधू पाहत आहे. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीसाठी ओबीसी चेहरा असावा असा मतप्रवाह भाजपमध्ये होता. त्यामुळे बावनकुळे यांचे नाव सर्वाधित चर्चेत होते. बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष होणार याबाबत वृत्त 'सरकारनामा'ने नुकतेच दिले होते. आज बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने सरकारनामाचे वृत्त खरे ठरले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत असलेली मुंबई मनपातील सत्ता खाली खेचण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. आशिष शेलार यांच्याकडे पुन्हा जबाबदारी दिली आहे. कॅबिनेट मंत्रीपदी शेलार यांना संधी दिली नसली तरी भाजपा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक पाहता मुंबई भाजपा अध्यक्षाची जबाबदारी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT