Deepak Kesarkar : दीपक केसरकर होणार पर्यटनमंत्री ? ; संभाजीराजेंनी दिले संकेत

Deepak Kesarkar latest news : शिंदेनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करायला पाहिजे," असे संभाजीराजे म्हणाले.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर (udayanraje bhosale) यांनी आज खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. उदयराजेंच्या भेटीनंतर त्यांनी माजी खासदार संभाजीराजे यांचीही भेट घेतली. यावेळी संभाजीराजे (sambhajjraje) म्हणाले, "दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना पर्यटनमंत्री व्हावे, असा आमचा आग्रह आहे," या मंत्रीपदाबाबत केसरकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकार परिषदेत हे दोन्ही नेते बोलत होते. (Deepak Kesarkar latest news)

दीपक केसरकर म्हणाले, "उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मला पर्यटन स्थळांबाबत मार्गदर्शन केले आहे. मी पर्यटन मंत्री होवो किंवा न होवो. पण आपल्या गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे,"

"राज्यात झालेले मराठा आंदोलन पेटणार होते. पण त्यावेळी संभाजीराजेंच्या एका शब्दांवर मराठा आरक्षण आंदोलन मागे घेतले होते. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार आहे," असे केसरकर म्हणाले. "एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणाबाबत सर्व विषय माहित आहे. शिंदेनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करायला पाहिजे," असे संभाजीराजे म्हणाले.

Deepak Kesarkar
Thackeray vs Shinde : ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षांची सुनावणी आता नव्या सरन्यायाधीशांसमोरच..

"पर्यटन मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांनी अडीच वर्षे काम केले. आता उरलेल्या अडीच वर्षांत नवा पर्यटन मंत्री जे काम करून दाखवेल, तेव्हा दोघांच्या कामातला फरक दिसेल. त्यानंतर आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्रात फिरण्याचा अधिकार राहणार नाही.आमच्यावर टीका करण्यापूर्वी तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले याचा आधी विचार करावा," अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर काल (गुरुवारी) टीकास्त्र सोडले.

विकासकामांसाठी भेट घेतली

केसरकर- उदयनराजेंची भेट झाली त्यानंतर उदयनराजे म्हणाले, "राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, महाबळेश्वरमध्ये आणखी कोणती विकासकामे करता येतील याबाबत त्यांनी चर्चा केली. केसरकर आज पुणे दौरा करून सातारमध्ये जाणार आहेत. त्यानंतर कोल्हापूरमध्ये मुक्काम करून उद्याही ते कोल्हापूरमध्ये असतील. त्यानंतर ते सिंधुदुर्गला रवाना होतील. त्यामुळे मी आज सातारमध्ये नसल्याने आज त्यांची पुण्यात भेट घेतली."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com