Sanjay Kakade, Rajesh Pandey, Varsha Tapkir News  Sarkarnama
मुंबई

BJP Pune : भाजपने भाकरी फिरवली; कार्यकारिणीत मोठे फेरबदल : काकडे, तापकीर आउट, पांडे इन

BJP News : भारतीय जनता पार्टीची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

State executive of BJP announced : भारतीय जनता पार्टीची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. उपाध्य, सरचिटणीसांह अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांना या कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे तर काहींची बढती देण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पक्षाची राज्य कार्यकारीनी जाहीर केली. यामध्ये पुणे शहर भाजपाचे (BJP) संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांना बढती देण्यात आली आहे. त्यांना प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले आहे. राज्य उपाध्यक्ष असेलले माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांना उपाध्यक्षपदावरून पायउतार करत विशेष निमंत्रितांमध्ये संधी देण्यात आली आहे.

तसेच तीनवेळा नगरसेविका राहिलेल्या वर्षा तापकीर या गेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष होत्या. त्यांनाही नव्या कार्यकारिणीत वगळण्यात आले आहे. दोन वर्षापूर्वी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर संधी हवी होती. मात्र, ती न मिळाल्याने त्यावेळी त्या नाराज झाल्या होत्या. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्याचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते.

या व्यतिरिक्त त्यामध्ये माधव भंडारी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर कोकणची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी आमदार चैनसुख संचेती यांची उपाध्यक्ष पश्चिम विदर्भ, सुरेश हळवणकर यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, संजय भेगडे उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, माजी खासदार अमर साबळे यांची उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र.

तर स्मिता उदय वाघ महिला उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, जयप्रकाश ठाकुर उपाध्यक्ष मुंबई, संजय भेंडे उपाध्यक्ष पूर्व विदर्भ, गजानन घुगे उपाध्यक्ष मराठवाडा, राजेश पांडे उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, विक्रम पावसकर उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, अतुल काळसेकर उपाध्यक्ष कोकण अशा विविध जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT