Wardha District APMC Analysis : वर्धा जिल्यात बाजार समिती भाजपच्या आवाक्यापासून दूरच !

Wardha Bazar Samiti : भाजपचे खासदार, तिन्ही आमदार, जिल्हाध्यक्ष, माजी खासदार सर्वच कामाला लागले होते.
Wardha APMC
Wardha APMCSarkarnama
Published on
Updated on

Wardha District APMC Elections Results Analysis: वर्धा जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. निवडणूक जाहीर झाली त्या काळापासून भाजपचे खासदार, तिन्ही आमदार, जिल्हाध्यक्ष, माजी खासदार सर्वच कामाला लागले होते. त्यांच्याकडून झालेल्या प्रयत्नांना जिल्ह्यात बाजार समित्यांत मतदारांनी भाजपला नाकारले. (Voters rejected BJP in market committees)

सातही बाजार समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी गट आणि सहकार गटाने सत्ता मिळविली. सात बाजार समितीत भाजपच्या वाट्याला १८ जागा आल्या. त्यासुद्धा सहकार गटाच्या मदतीने. वर्धा जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप यापूर्वी कधीच पूर्ण सामर्थ्याने उतरली नव्हती. या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात उतरण्याची त्यांची ही पहिली वेळ आहे. असे असले तरी जिल्ह्यात खासदार आणि तीन आमदार असल्याने बाजार समित्या बळकावणे त्यांच्यासाठी काही विशेष नव्हते.

बाजार समितीत सातत्याने सत्तेत असलेल्या सहकार गटात असलेली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी बाजार समितीत भाजपला विशेष यश मिळू दिले नाही. जिल्ह्यात एकमेव आर्वी तालुक्यात भाजप समर्थीत सत्ता आली. यासाठी त्यांना सहकार गटाशी हातमिळवणी करावी लागली.

ज्या भागात भाजप सामर्थ्याने एकटी लढली, त्या ठिकाणी त्यांना खातेही उघडता आले नाही. वर्ध्याच्या आमदारांचे प्राबल्य असताना त्यांना येथील बाजार समितीत एकही जागा मिळाली नाही. येथे आमदार रणजीत कांबळे, सहकार नेते माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या गटाने बाजी मारली. याच गटाने पुलगाव बाजार समितीत सत्ता स्थापन केली. खासदारांचे घर असलेल्या देवळी-पुलगाव बाजार समितीत तर भाजपला खातेही उघडता आले नाही.

Wardha APMC
Yavatmal District APMC Analysis : बाजार समितीच्या निकालाने महाविकास आघाडी चार्ज !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. सुधीर कोठारी, देवळीचे काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे, भाजपचे आमदार समीर कुणावार आणि शेतकरी संघटनेची शेतकरी विकास आघाडी पुढे आली. आमदार कुणावार यांच्या निर्णयाला पक्षाचा विरोध असल्याने इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात असलेल्या गटाशी युती केली. त्यात कुणावार यांच्या तीन जागा आल्या तर विरोधात असलेल्या गटाला पराभवाचा सामना करावा लागला.

हाती असलेल्या एकमेव आष्टी बाजार समितीत भाजपला सत्ता गमवावी लागली. येथे काँग्रेसने बाजी मारली. सिंदी बाजार समितीत आमदार डॉ. पंकज भोयर यांचा पराभव झाला. येथे काँग्रेसचे शेखर शेंडे, राकाँचे समीर देशमुख यांनी बाजी मारली. समुद्रपूर येथे सहकार गटाने बाजी मारली. यामुळे जिल्ह्यातील बाजार समितीत एकहाती सत्ता स्थापनेकरिता भाजपला प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे या निवडणुकीतून पुढे आले आहे.

Wardha APMC
Akola APMC Election Analysis : राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसला तोड मिळाला, वंचितचा सहकारात शिरकाव !

हिंगणघाटात भाजप, काँग्रेस आणि राकाँ एकत्र..

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील (Maharashtra) प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी एक म्हणून ओळखली जाते. या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) समर्थीत अॅड. कोठारी यांच्या सहकार गटाची सत्ता आहे. त्यांना पूर्वीपासून काँग्रेसचा (Congress) पाठिंबा मिळाला आहे. यामुळे बाजार समितीत जागा मिळविण्यासाठी त्यांच्याशी युती करण्याचा निर्णय भाजपचे (BJP) आमदार समीर कुणावार यांनी घेतला.

Wardha APMC
Arni APMC Election Analysis : ना पक्ष, ना आघाडी, जात ठरली सगळ्यात भारी !

बाजार समितीमधील पक्षीय बलाबल

वर्धा - काँग्रेस १२, राष्ट्रवादी काँग्रेस पाच, अपक्ष एक

सिंदी - काँग्रेस तीन, राष्ट्रवादी काँग्रेस १२, भाजप तीन

आष्टी - काँग्रेस १५, भाजप तन

पुलगाव - काँग्रेस १३, राष्ट्रवादी पाच

हिंगणघाट - राष्ट्रवादी काँग्रेस नऊ, काँग्रेस चार, भाजप तीन, शेतकरी संघटनेला एक

आर्वी - सहकार गट ११, भाजप पाच, काँग्रेस दोन

समुद्रपूर - राष्ट्रवादी काँग्रेस १२, भाजप चार, शेतकरी संघटना दोन

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com