Chandrashekhar Bawankule News Sarkarnama
मुंबई

Chandrashekhar Bawankule News : तुमच्या मनातील मुख्यमंत्र्यांसाठी कामाला लागा; बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना सूचक इशारा

BJP News : ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Amol Jaybhaye

Thane News : ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे भाजप महाविजय २०२४ या अभियानांतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी कार्यकर्त्यांची मनातील मते जाणून घेतली. या वेळी २०२४ मध्ये मुख्यमंत्री कोण हवा, असा प्रश्न विचारला असता, 'देवेंद्र फडणवीस' यांचे नाव कार्यकर्त्यांनी एखमुखाने घेतले. त्यानंतर तुमच्या मनातील मुख्यमंत्री हवा असल्यास कामाला लागा, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. त्यामुळे आगामी काळात भाजप (Bjp) विरुद्ध शिवसेना असा संघर्ष दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या महाविजय-२०२४ मध्ये ठाणे लोकसभा प्रवास योजनेंतर्गत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाणे शहराचा मंगळवारी झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी गडकरी रंगायतनमध्ये भाजपच्या एक हजार 'सुपर वॉरियर्स'बरोबर संवाद साधला. त्यांनी ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील भाजपने नियुक्त केलेल्या एक हजार कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

या वेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेतल्या. २०२४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवंय ? बोला तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवाय ? असा प्रश्न बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना विचारला. त्यावर 'देवेंद्र फडणवीस' यांचे नाव कार्यकर्त्यांनी घेतले.

या मागणीनंतर बावनकुळे यांनी 'मग लागा कामाला' अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री पदावरून शिवसेना (Shivsena) भाजपत संघर्ष उडण्याची शक्यता निर्माण होण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT