Chhagan Bhujbal News : भुजबळांच्या निधीवरून उडणार राजकारणाचा भडका!

Politics on Chhagan Bhujbal MLA Funds boycott politics-हनुमाननगर (निफाड)च्या सरपंचांनी माफी मागितल्याचा इन्कार करीत थेट ग्रामसभा घेण्याचे जाहीर केले.
Gopinath Thube, Chhagan Bhujbal & Manoj Jarange
Gopinath Thube, Chhagan Bhujbal & Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Issue : पालकमंत्री छगन भुजबळ प्रतिनिधित्व करीत असलेल्या येवला मतदारसंघातील हनुमाननगर ग्रामपंचायतने भुजबळ यांचा आमदारनिधी न घेण्याचा ठराव केला होता. त्यावरून आता भुजबळ समर्थक आणि ग्रामस्थ यांच्यात वादाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. (Hanumannagar Grampanchayat boycott MLA funds from Chhagan Bhujbal)

मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हनुमाननगर (Nashik) या गावाच्या निर्णयाने खळबळ उडाली होती. आता भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सरपंचाने सदस्यांनी बैठक न घेताच ठराव केला, असा दावा करीत सरपंचांनी माफी मागितल्याचा दावा केला होता.

Gopinath Thube, Chhagan Bhujbal & Manoj Jarange
Nashik Drug Politics : ड्रग्ज प्रकरणावरून दोन्ही शिवसेनेत जोरदार जुंपली!

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून निफाड तालुक्यातील हनुमाननगर गावाच्या विकासासाठी कुठलाही निधी घेतला जाणार नाही, याबाबत १३ ऑक्टोबरला असा ठराव झाला होता. हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्या बातम्यादेखील आल्याने तो चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर या सरपंचाने ग्रामपंचायतीची बैठक न घेताच परस्पर ठराव केला. त्यासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त करीत मंत्री भुजबळ यांना माफीनामा लिहून दिल्याचा दावा करण्यात आला होता.

मंत्री भुजबळ यांचा हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे या विषयावरील राजकारण अधिकच तापले. यासंदर्भात सरपंच गोपीनाथ ठुबे यांनी प्रत्युत्तर म्हणून त्याचे खंडण करणारा संदेश टाकला. मात्र, काही वेळाने तो काढून टाकला. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली.

याविषयी सरपंच गोपीनाथ ठुबे म्हणाले, मी माफी मागितलेली नाही. माफी मागण्याचे काहीच कारण नाही. जो विकासनिधी येतो, आमदाराचा वैयक्तिक नव्हे तर राज्य शासनाचा असतो. त्यामुळे हा निधी घ्यायचा नाही, या भूमिकेत बदल करून निधी स्वीकारणार आहोत, एवढाच बदल झाला. मात्र, आमची भूमिका कायम आहे. या विषयावर सगळ्यांच्या भावना तीव्र असल्याने तातडीची ग्रामसभा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात ग्रामस्थ जो निर्णय घेतील, तो सर्व मान्य करतील. मात्र, एका गावाने मराठा आरक्षणाच्या विषयावरून थेट राज्याचे मंत्री व मतदारसंघाचे आमदार भुजबळ यांचा निधीच घ्यायचा नाही, असा निर्णय घेतला. त्यावर पुन्हा ग्रामसभा घेणार असल्याने कदाचित या विषयावरून भविष्यात राजकारणाचा आणखी भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Gopinath Thube, Chhagan Bhujbal & Manoj Jarange
Rahul Gandhi In Mizoram : राहुल गांधींमधील 'कॉमन मॅन' पुन्हा रस्त्यावर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com