Chandrashekhar Bawankule Letter To BJP Activists : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सुरू असलेली महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर संपली आहे.अखेरच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता.20)पार पडली.प्रचारसभा, बैठका, दौरे,भेटीगाठी,आरोप- प्रत्यारोपांनी महाराष्टाचं राजकारण ढवळून काढलं होतं.पण आता मतदान पार पडल्यानंतर आता निकालासाठी सर्वांनाच 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.पण एकीकडे मतदान प्रक्रिया संपल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी कार्यकर्त्यांसाठी खास पत्र लिहिलं आहे.
भाजपनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात 'चारशे पार' तर महाराष्ट्रात मिशन 45 चा निर्धार केला होता. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दिग्गज नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनीच कंबर कसली आहे.दिवसरात्र,ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता भाजपने फक्त देशात एनडीए आणि राज्यात महायुतीच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडणुका जिंकून येतील यासाठी अफाट मेहनत घेतली. त्यात शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही चांगलेच पळवले.
पण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी खास पत्र लिहिलं आहे. त्यात आपण या निवडणुकीत घेतलेल्या परिश्रमाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करीत आहे.किंबहुना ते माझे कर्तव्य आहे. 4 जूनला आपण सर्वजण मिळून जल्लोष करू आणि आपल्या महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकवू. तुम्हाला जशी आतुरता आहे, तसाच मी देखील उत्सुक आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात,लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्व टप्पे सुरळीत पार पडले.निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता एका स्वप्नासाठी भारावून जाऊन अहोरात्र काम करीत होता.ते स्वप्न होते,आदरणीय @narendramodi जी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचे...विकसित भारताचे...! येत्या 4 जूनला आपण सर्वजण मिळून जल्लोष करू आणि आपल्या महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकवू असा विश्वास व्यक्त करतानाच कार्यकर्त्यांचे आभारही मानले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात,महाराष्ट्र भाजपा परिवारातील सर्व सहकारी मित्रांनो,लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्व टप्पे सुरळीत पार पडले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता एका स्वप्नासाठी भारावून जाऊन अहोरात्र काम करीत होता. ते स्वप्न होते, आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचे... विकसित भारताचे...! या स्वप्नासाठी आपण सर्वांनी अक्षरशः जीवाचे रान केले. घरदार विसरून,अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. मी आपल्या प्रामाणिक निष्ठेसमोर नतमस्तक असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
याचवेळी भारतीय जनता पार्टी (BJP) हा राजकीय पक्ष नाही. ते कुटुंब आहे. आपणा सर्वांचे एकमेकांशी असलेले नाते रक्ताच्या नात्यापलीकडचे आहे. या निवडणुकीत ही आपलुकी,जिव्हाळा मी क्षणोक्षणी अनुभवला. हे सारे क्षण मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवले आहेत. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नसल्याचेही ते म्हणाले.
बावनकुळे म्हणाले, या निवडणुकीचा प्रवास बूथ समित्यांपासून सुरू झाला आणि तो लाखोंच्या सभांपर्यंत विस्तारत गेला.खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भक्कम पाठबळ आपल्यासोबत होते.देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक सभेचे नियोजन, रोजच्या प्रचाराची आखणी यासाठी आपण कार्यकर्त्यांनी किती बैठका घेतल्या असतील याची गणतीच नाही.
बूथ समिती,शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक,सुपर वॉरियर्स, सोशल मीडिया संयोजक यांच्यासह हजारो कार्यकर्ते,संघटनेतील पदाधिकारी यांच्यासह माझे विधिमंडळातील सर्व आजी- माजी सहकारी निवडणुकीच्या रिंगणात कार्यरत होते.
प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यांत आणि प्रत्येक गाव-खेड्यात आपण मोदींच्या विकसित भारताचे स्वप्न घेऊन पोहोचलो. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा,अमित शाह यांनी प्रत्येक पावलावर आपल्याला खंबीर साथ दिली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या सर्वांचा उत्साह सतत उंचावत गेला.
मित्रांनो, एक गोष्ट अगदी मनापासून सांगतो, राष्ट्रप्रेमाने भारलेल्या लाखो कार्यकर्त्यांची अखंड मेहनत हाच आपल्या पक्षाच्या यशाचा बलदंड पाया आहे. एकमेकांच्या सुख- दुःखात सहभागी होत, काळजी घेत आपण सर्वजण अविश्रांत राबलात त्यामुळेच आपला पक्ष या निवडणुकीत फार मोठ्या यशाला गवसणी घालणार आहे. हे सारे यश केवळ आणि केवळ तुमचेच राहणार आहे.आपण या निवडणुकीत घेतलेल्या परिश्रमाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करीत आहे. किंबहुना ते माझे कर्तव्य असल्याचे सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.