Jalna Loksbha Constituency : जालन्यात सत्तार-खोतकर जोडीचा डाव दानवे उधळून लावतील का ?

Political News : लोकसभेच्या जालना मतदारसंघाची. महायुतीच्या मिशन-45 मध्ये फिक्स समजल्या जाणाऱ्या या जागेच्या निकालाबद्दल अनेक तर्क लढवले जात आहेत.
Abdul Sattar, Arjun Khotkar, Raosaheb danve
Abdul Sattar, Arjun Khotkar, Raosaheb danve Srakarnama

Jalna News : मराठवाड्यात सर्वाधिक चर्चा सुरू आहे, ती लोकसभेच्या जालना मतदारसंघाची. महायुतीच्या मिशन-45 मध्ये फिक्स समजल्या जाणाऱ्या या जागेच्या निकालाबद्दल अनेक तर्क लढवले जात आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपने सहाव्यांदा या मतदारसंघातून उमेदवारी दिली.

एवढेच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जालन्यातील जाहीर सभेत तुम्ही दानवेंना सहाव्यांदा निवडून द्या, तुम्हाला माहित नाही, ते खूप मोठे नेते होणार आहेत, असे भाकित केले होते. भला आदमी बडा होणार? याचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा होती. परंतु प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी महायुतीच्या (Mahayuti) दोन मोठ्या नेत्यांकडूनच रावसाहेब दानवे यांना धोका झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सुरू आहे. ( Jalna Loksbha Constituency News)

Abdul Sattar, Arjun Khotkar, Raosaheb danve
Raju Patil News: 2014 सालची शरद पवारांची जर सुपारी असेल, तर होय आम्हीही...! मनसेच्या राजू पाटलांनी घेतली शाळा

एकतर मराठा आरक्षणाच्या लढ्याचे केंद्रबिंदू असलेला हा मतदारसंघ, त्यामुळे आधीच सरकार बद्दलच्या नाराजीचा फटका बसण्याची भिती वर्तवली जात होती. त्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटच्या दोन बड्या नेत्याच्या नाराजीचा फटका दानवेंना बसू शकतो, असा दावा केला जातोय. ते दोन बडे नेते म्हणजे राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि दुसरे शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर.

नाराज खोतकर सुरुवातीला दानवेंच्या प्रचारापासून अंतर राखून होते. पण दानवे यांनी स्वतः खोतकरांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली होती. त्यानंतर 8 मे पासून म्हणजे मतदानाच्या पाच दिवसांपूर्वी खोतकर रावसाहेब दानवे यांच्यासोबत प्रचारात दिसले. युतीच्या विशेषतः शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहू नये, यासाठी लोकसभेच्या मदतीची परतफेड अर्जुन खोतकर यांच्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी करण्याची गॅरंटी दानवे यांनी घेतली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भलतासलता विचार मनात आणू नका, असे आवाहन त्यांनी केले होते. पण त्यांच्या गॅरंटी काही खोतकर समर्थकांच्या पचनी पडली नाही. खोतकर प्रचारसभांमधून रावसाहेब दानवे यांच्यासाठी मतांचे आवाहन करत होते, पण त्याचवेळी पडद्यामागे वेगळ्याच हालचाली सुरु होत्या, असे बोलले जाते. अब्दुल सत्तार आणि अर्जून खोतकर यांच्यातील राजकीय मैत्री काही लपून राहिलेली नाही.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी खोतकरांना रावसाहेब दानवेंच्या विरोधात लोकसभा लढवण्याचा सल्ला देत त्यांना घोड्यावर बसवले होते. खोतकरांनीही जोरदार तयारी करत दंड थोपटले होते. पण आपला सगळा राजकीय अनुभव पणाला लावत रावसाहेब दानवे यांनी आपल्याविरोधातील बंड तेव्हा देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या मदतीने मोडून काढले होते.

Abdul Sattar, Arjun Khotkar, Raosaheb danve
Bhujbal Vote to Shivsena : बाळासाहेबांना चॅलेंज करणाऱ्या भुजबळांनी 34 वर्षांनंतर उमटवली धनुष्यबाणावर मोहोर...!

शिवसेना-भाजप युती असल्याने अर्जूनास्त्र खोतकरांना म्यान करावे लागले होते. तेव्हा फसलेला डाव सत्तार-खोतकर जोडीने 2024 मध्ये पुन्हा टाकल्याची चर्चा आहे. महायुती आणि राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्यामुळे सत्तार-खोतकर या एकाच पक्षात असलेल्या नेत्यांसाठी हा डाव सोपा नव्हता. दानवेंच्या विरोधात थेट मैदानात उतरणे दोघांच्याही राजकीय भवितव्यासाठी धोक्याचे ठरणार होते.

त्यामुळे सत्तार-खोतकर यांनी सोबत राहून दानवेंच्या करेक्ट कार्यक्रम लावल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. आता सत्तार-खोतकर जोडीची खेळी यशस्वी ठरते? की मग राजकारणात विरोधकांना चकवा देण्यात माहिर असलेले रावसाहेब दानवे या जोडीचा डाव उधळून लावण्यात यशस्वी होतात, हे चार जूनच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

Abdul Sattar, Arjun Khotkar, Raosaheb danve
Jalna Lok Sabha Analysis : 'मिशन 45'मध्ये जालना आहे का? रावसाहेब दानवेंच्या 'या' दाव्यानंतर आकडेमोड सुरू

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com