Congress, BJP Sarkarnama
मुंबई

BJP Vs Congress: भाजपचा हल्लाबोल, काँग्रेसवर मोठी नामुष्की, थेट ट्विट डिलीट करण्याची आली वेळ; 'हे' आहे कारण

Mumbai Congress Delete Post : मुंबई काँग्रेसने 'X' प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये अमेरिकेतील एफबीआयकडून गंभीर आरोप करण्यात आलेल्या एका गुप्तचर अधिकाऱ्याचे समर्थन काँग्रेसकडून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय पक्षांना फटका बसल्याचं अनेकदा दिसून आलं आहे.लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी भारताच्या विविधतेवर केलेलं भाष्य करत अडचणीत आणलं होतं.

खुद्द पंतप्रधान मोदींनी पित्रोदा यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला होता. त्यानंतर काँग्रेसवर (Congress) सारवासारव करण्याची वेळ आली होती. आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर मोठी नामुष्की ओढवली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसने शुक्रवारी (ता.18) सोशल मीडियाच्या 'X' प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये अमेरिकेतील एफबीआयकडून गंभीर आरोप करण्यात आलेल्या एका गुप्तचर अधिकाऱ्याचा दाखला या पोस्टमध्ये देण्यात आला होता. ही पोस्ट मुंबई काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरुन करण्यात आल्यामुळे त्यावर राजकीय वातावरण तापलं.

मुंबई काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप करण्यात आला होता. विकास यादवाच्या सहभागाचा हवाला देत काँग्रेसने हा मोदींच्या आंतरराष्ट्रीय दडपशाहीचा धक्कादायक चेहरा असून देशातील गुप्तचर यंत्रणांमधील अधिकाऱ्यांचा परदेशातील हत्येत सहभागी होतात असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसकडून करण्यात आला होता. या टीकेला भाजपकडून पलटवार केला आहे.

मुंबई भाजप (BJP) सचिव प्रतिक कर्पे यांनी मुंबई काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ट्विटला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात त्यांनी 'भारत तोडणे हेच काँग्रसचे धोरण' असल्याची घणाघाती टीका केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसने अखेर आपलं ट्विट डिलीट केले आहे. कर्पे यांनी आपल्या पोस्टमध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप एका माजी भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यावर केला आहे. याला काँग्रेसचे मिळणारे समर्थन देशासाठी घातक आहे असल्याचा हल्लाबोल केला होता.

तसेच देशाच्या विभाजनाला जबाबदार असलेला काँगेस आणि त्यांचे नेते देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब करत आहेत असल्याची टीकाही केली होती. त्यानंतर मुंबई काँग्रेसने आपलं ट्विट डिलिट केलं आहे.

अमेरिकेतील एफबीआयकडून विकास यादव याला वॉन्टेट लिस्टमध्ये टाकले आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी विकास यादव याच्यावर अमेरिकेतील एफबीआयकडून आरोप निश्चित करण्यात आले आहेत. एफबीआयने विकास यादव याला वॉन्टेट लिस्टमध्ये टाकले आहे.

अमेरिकन वकिलांनी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा अयशस्वी कट रचल्याप्रकरणी गुरुवारी (ता.17) धक्कादायक खुलासा केला आहे. यात विकास यादव यांचं नाव समोर आलं आहे. यादव यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग आणि हत्या असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. हे आरोप न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेल्या दुसऱ्या आरोपाचा भाग आहेत. गुरपतवंत सिंग पन्नूला भारताने दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्याकडे सध्या अमेरिकन नागरिकत्व आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने या पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात खटलाही दाखल केला होता. यामध्ये निखिल गुप्ता नावाचा भारतीय नागरिक आणि एका अज्ञात भारतीय सरकारी अधिकाऱ्यावर पन्नूच्या हत्येची योजना आखल्याचा आरोप करण्यात आला. निखिल गुप्ताला गेल्यावर्षी जूनमध्ये अटक करण्यात आली. गुप्ता सध्या अमेरिच्या तुरुंगात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT