Uddhav Thackeray : दीपकआबांचा प्रवेश अन् रूग्णालयातून आल्यानंतर पहिलंच भाषण, उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले, “आधी ह*****”

Sangola Assembly constituency: सांगोल्यातून आधी निवडून आलेला आमदार गद्दार झाला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी शहाजीबापून पाटील यांच्यावर करत, सांगोलेकर माझ्यासोबत आहेत, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
uddhav thackeray
uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रसचे सोलापूर जिल्ह्याध्यक्ष दीपक आबा साळुंखे यांचा शिवसेनेत ( ठाकरे गट ) प्रवेश झाला आहे. संपूर्ण घराघरात आली मशाल पोहोचवा. मी दीपकआबा साळुंखे यांच्या हातात मशाल दिली आहे. त्यांची धग तुम्हाला दाखवून द्यायची आहे. आपला विजय नक्की आहे, असा विश्वास व्यक्त करत  शिवसेना ( ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे दीपकआबा साळुंखे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

‘मातोश्री’ निवासस्थान येथे दीपकआबा साळुंखे यांच्या हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. यावेळी खासदार संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई आणि कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले, “दसऱ्यानंतर मी पहिल्यांदा तुमच्यात आलो आहे. मधल्या काळात रूग्णालयाची वारी करावी लागली होती. डॉक्टर म्हणालेले आराम करा... म्हणलं आता आराम करायचा तरी किती? आधी ह***** घालवायचं आहे. त्यामुळे आता आराम नाही. दीपकआबांसारखा मजबूत गडी शिवसेनेत सामील होत आहे.”

uddhav thackeray
Sangola News: ठाकरेंच्या गुगलीने महाआघाडीत पुन्हा खळबळ; सांगोल्यात मशाल की शेकाप?

“दीपकआबांच्या हातात मशाल दिली आहे. याचा अर्थ ज्यानं-त्यानं समजून घेतला पाहिजे. ही मशाल कशी पेटवायची आणि कोणाला चटके द्यायचे हे तुम्हाला ठरवायचं आहे. ही निवडणूक सोप्पी नाही. दीपकआबा पक्षात आले म्हणजे, विजय नक्की आहे. आजपासून घराघरात मशाल पोहोचवली पाहिजे. कारण, हे गद्दार नुसते गद्दार नाहीत, बरेच खोके घेऊन बसले आहेत. धनुष्यबाण मशाल असा संभ्रम निर्माण करत आहेत,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

“अजून कोणाचीही उमेदवारी जाहीर केली नाही. फक्त दीपकआबांच्या हातात मशाला दिली आहे. मशालीची धग तुम्हाला दाखवून द्यायची आहे. मी सभेला आल्यावर विस्तारानं बोलेन. सांगोल्यातून आधी निवडून आलेला आमदार गद्दार झाला तरी, सांगोलेकर माझ्यासोबत आहेत, हे तुम्ही दाखवून द्यायचं आहे. माझ्या शब्दाला जागाल आणि आमदार निवडून आणाल,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com