KDMC Dipesh Mhatre sarkarnama
मुंबई

BJP Vs MNS : भाजप-मनसे संघर्ष टोकाला; सत्तेचा लाडू हवा का? दीपेश म्हात्रेंनी डिवचले

KDMC Dipesh Mhatre Gajanan Kale : मनसेकडून कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याविरोधात आता भाजपने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

शर्मिला वाळुंज

KDMC Politics : कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात भाजप आणि मनसेमधील शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी कल्याण-डोंबिवलीतील राजकीय परिस्थितीवर भाष्य केल्यानंतर भाजपचे प्रसिद्धीप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला.

नवी मुंबईतील राजकारण सांभाळण्याऐवजी कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात हस्तक्षेप कशासाठी, असा सवाल करत म्हात्रे यांनी मनसेच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महाराष्ट्रात तुम्ही सत्तेत नाही आणि फक्त कल्याण-डोंबिवलीमध्ये तुम्हाला सत्तेतला लाडू हवा, सत्तेचा मलिदा खाण्यासाठी...” असा टोला म्हात्रे यांनी लगावला.

गजानन काळे यांनी कल्याण-डोंबिवलीतील सत्ताकारण आणि राजकीय पक्षांच्या भूमिकेवर भाष्य करताना मनसेची भूमिका मांडली होती. स्थानिक राजकारणात मनसेने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करत त्यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक भाजपमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले.

याच पार्श्वभूमीवर दीपेश म्हात्रे यांनी काळे यांना थेट प्रत्युत्तर दिले. “नवी मुंबईच राजकारण करा, इकडचं राजकारण करायला तुमची लोकं नाहीत का? नवी मुंबईवरून तुम्ही कल्याण-डोंबिवलीच्या लोकांना तत्त्वज्ञान शिकवणार का?”

संघर्ष वाढणार

मनसेकडून स्थानिक प्रश्नांवर सातत्याने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात असताना भाजपकडूनही मनसेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात महापालिकेतील प्रत्येक निर्णयावरून भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT