

Bjp Workers Join Mns: गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.शिक्षण,विद्यार्थी समस्या आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या घटनेनंतर अमित ठाकरे आणि भाजप युवा कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेनं भाजपला मोठा झटका दिला आहे.
पंतप्रधानांच्या फोटोवरून मनसे आणि भाजपमध्ये सुरू असलेला वाद अद्याप शांत झालेला नसतानाच मुंबईत भारतीय जनता युवा मोराच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत मनसेमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी भाजयुमोत काम करताना अडथळा येत होता अस सांगत अमित ठाकरेंच्या विद्यार्थ्यांसाठीच्या कामामुळे आम्ही मनसेत प्रवेश केला असल्याचं सांगितले.
भाजपवर टीका
२०१४ पासून भाजप सत्तेत आहे. हे सरकार जाणूनबूजून प्रश्नांकडे दृर्लक्ष करत आहे. कोणीतरी दिल्लीतून येत आहे म्हणून तुम्ही रस्ते साफ करणार का? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. हे सरकार सामान्य लोकांना मुळ मुद्द्यांपासून भरकटवत असून शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या प्रश्नांवर सरकारने काम करावे अशी आमची मागणी असून आम्ही त्यापासून तसूभरही मागे सरणार नाही असं यावेळी अमित ठाकरेंनी म्हटलं.
दरम्यान, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला तर तो आम्ही काढणारच, असा पुन्हा एकदा इशारा अमित ठाकरेंनी यावेळी दिला. फोटो प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदींना महापुरुषांच्या रांगेत बसवण्यास विरोध दर्शवला होता.त्यामुळे भाजप-मनसेमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
एकीकडे फोटोचा वाद सुरू असतानाच भाजप युवा मोर्चातील पदाधिकाऱ्यांचा मनसे प्रवेश झाल्याने ठाकरेंच्या नेतृत्वाला संघटनात्मक बळ मिळाले आहे. मुंबईतील युवा आणि कार्यकर्त्यांमध्ये मनसेची पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वी मनसेविरोधातील युवा मोर्चाच्या आंदोलनाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. आंदोलन करताना संयम राखण्याचा सल्ला त्यांनी युवा नेत्यांना दिला होता. आता भाजपच्या युवा संघटनेतील कार्यकर्त्यांचा मनसे प्रवेश,अमित ठाकरेंची वाढती सक्रियता आणि फोटोवरून सुरू असलेला संघर्ष यामुळे मुंबईतील भाजप-मनसेमधील राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.