MNS MLA Raju Patil and Dr Shrikant Shinde and MLA Ganpat Gaikwad  Sarkarnama
मुंबई

BJP Vs Shinde Shivsena: कल्याण लोकसभेच्या जागेवरुन आमदार-खासदाराच्या वादात राजू पाटलांची एन्ट्री

MNS MLA Raju Patil: कल्याण लोकसभेच्या जागेवरुन आमदार गणपत गायकवाड आणि खासदार शिंदे यांच्यात राजकारण तापलं.

शर्मिला वाळुंज

Dombivli News: कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी होईल, असे संकेत आमदार गणपत गायकवाडांनी दिले. तर त्यांचे हे वक्तव्य म्हणजे मनोरंजन आहे, असे प्रत्युत्तर खासदार डॉ.श्रीकांत शिंदेंनी दिले. यावर पुन्हा आमदार गायकवाडांनी ट्वीट (एक्स) करत प्रत्युत्तर दिले. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून सुरू असलेल्या आमदार गायकवाड आणि खासदार शिंदे यांच्या रणकंदनात आता मनसे आमदार राजू पाटील यांची एन्ट्री झाली आहे. भाजपची ती सवयच असे म्हणत खासदारांनी आमदारांशी आपले वर्तन सुधारावे, असा थेट सल्लाही पाटलांनी दिला.

कल्याण लोकसभा मतदारसंघावरून सत्तेतील भाजप आणि शिंदे गटात पुन्हा एकदा चढाओढ दिसून येऊ लागली आहे. भाजजच्या वरिष्ठांनी शिवसेनेच्या जागा त्यांनाच जातील, असे म्हणत शिंदे गटाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही स्थानिक पातळीवरील आमदार मात्र, हा संघ शिवसेनेला सोडण्यास तयार नसल्याचे काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घडामोडींवरून दिसून येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे विकास कामावरून शिंदे गटाला सातत्याने बोलताना दिसून येत आहेत. देशातील तीन राज्यांच्या निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. यावरूनच आमदार गायकवाडांनी भिवंडी आणि कल्याण लोकसभेची जागा भाजपचा उमेदवार जिंकेल, असे विधान केले.

आता यावरून खासदार डॉ.शिंदे यांनी त्यांचे वक्तव्य हे मनोरंजन आहे, असे म्हणत त्यांना डिवचले. यानंतर आमदार गायकवाडांनी "ज्यांना गद्दारी करून कमी वेळात आमाप पैसा आणि सत्तेच बळ मिळाले, त्यांना त्यांच्या नजरेने सर्व जग विदूषक आहे, असा भास होतो", असे खरमरीत ट्वीट करत थेट शिंदे गटाला ललकारले.

लोकसभेसाठी मनसेचेही नाव चर्चेत आहेत. असे असतानाच यामध्ये आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील आपले मत मांडत भाजप आमदार गायकवाडांची बाजू घेत पाटलांनी थेट शिंदेंना सल्ला देऊ केला.

राजू पाटील म्हणाले, "या मागे दोन गोष्टी आहेत. नुकतेच तीन राज्याचे निकाल लागलेत. त्यात भाजपला भरघोस यश मिळाले आहे. भाजपची सवय आहे, ते चांगल्या परिस्थितीत असतील तर ते छोट्या पक्षांना दाबायचा प्रयत्न करतात. आता ते इथे तसं करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने ते बोलले असतील".

"तसेच दुसरी बाजू इथले जे खासदार आहे ते इतर पक्षीय आमदारांशी कशा पद्धतीने वागतात. त्यामुळे त्यांनी तशी भावना बोलून दाखवली, त्यामुळे ती योग्य आहे, असे वाटते. या लोकांनी आपल्याला ज्या भावनेने निवडून दिले, हे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघात सहा आमदार आहेत. त्याच्याशी चांगलं वागून त्यांच्या काही सूचनांचा अभ्यास केला तर त्यांना भविष्यात ते चांगले पडू शकते. हा माझा सल्ला त्यांना आहे. परंतु ते असे कधी वागताना दिसले नाही, त्यामुळे दुर्दैवाने असे बोलावे लागते", असे आमदार पाटील म्हणाले.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT