BJP Vs Shinde Shivsena : ठाकरेंनंतर भाजप आमदाराचाही शिंदे गटावर 'गद्दारी'चा शिक्का! कल्याणचा वाद चिघळणार

MLA Ganpat Gaikwad : कल्याणमधील भाजप-शिंदे गटातील वादाने महायुतीत तेढ होण्याची शक्यता
Ganpat Gaikwad, Shrikant Shind
Ganpat Gaikwad, Shrikant ShindSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Political News : तीन राज्यात मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर भाजपचे स्फुरण चढल्याचे दिसून येत आहे. कल्याण लोकसभा जागेवरून भाजपचे आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाला थेट 'गद्दार' म्हणत खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला. गायकावाडांनी केलेले या आशयाच ट्विट आता 'व्हायरल' होत आहे. परिणामी कल्याणमधील भाजप-शिंदे गटातील वाद काही केल्या शमताना दिसत नसल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिंदे गटाला विरोधक विशेषतः ठाकरे गट गद्दार, मिंधे गट म्हणून हिणवत आले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेते या बंडाचे कौतुक करत धडाकेबाज म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाठ थोपटतात. असे असतानाही भाजप आमदार गणपत गायकवाडांनी खासदार शिंदेंवर टीका करताना थेट गद्दार असा उल्लेख केला. त्यामुळे महायुतीत तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ganpat Gaikwad, Shrikant Shind
Manoj Jarange : ''मला जर शांतता ठेवायची नसती आणि मी जर त्या पोरांना...'' ; मनोज जरांगेंचं विधान!
Tweet
Tweet Sarkarnama

कल्याण (Kalyan) लोकसभेची जागा कोणाची, यावरून सत्ताधारी भाजप-शिंदे गटातील वाद वाढत आहे. येथून भाजपचा उमेदवार निवडून येईल, असा दावा आमदार गायकवाड वारंवार करतात. तेच विधान त्यांनी पुन्हा केले. यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी, 'गायकवाडांचे वक्तव्य मनोरंजन म्हणून घेतले पाहिजे,' असा टोला लगावला होता. यावर आमदार गायकवाडांनी यांनी ट्विट करत शिंदे गटाला सणसणीत उत्तर देले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) म्हणाले, 'ज्यांना गद्दारी करून कमी वेळात आमाप पैसा आणि सत्तेच बळ मिळाले आहे. त्यांना त्यांच्या नजरेने सर्व जग विदूषक आहे असा भास होतो !', असे आमदार गायकवाड म्हणाले. या ट्विटनंतर कल्याणमधील भाजप-शिंदे गटातील वाद तापण्याची शक्यता आहे. आता गायकवाडांच्या टिकेला शिंदे गट काय उत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे.

Ganpat Gaikwad, Shrikant Shind
Pankaja Munde : ऐन डिसेंबरमध्ये उकाडा का वाढला; पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com