Chandrakant Patil  Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : महाराष्ट्रात भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार?

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार अनेक दिवसांपासून रखडला आहे. सरकार स्थापन होऊन तब्बल 37 दिवस झाले आहेत. तरी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरत नाही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीमध्ये आहेत.

या दौऱ्यात विस्ताराबाबत निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विस्तारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आहे.

भाजपच्या नियमानुसार एक व्यक्ती एक पद अशी जबाबदारी आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मंत्री झाल्यास त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी नसणार आहे. त्यामुळे पुढील प्रदेशाध्यक्ष कोण असणार या विषयी राजकीय वर्तुळात विविध चर्चा होत आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणत्या नेत्याला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये सांगितले आहे. तसेच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवारांना देखील फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांना आता बोलावेच लागते. त्यामुळे त्यांना हे आठवावे लागेल की त्यांचा काळातही 30 ते 32 दिवस पाचच मंत्री होते, असे फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT