अबू आझमीला महाराष्ट्राच्या बाहेर फेकले पाहिजे : संभाजीराजे संतापले

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांची अबू आझमी यांच्यावर टीका
Abu Azmi, Sambhaji Raje Chhatrapati
Abu Azmi, Sambhaji Raje Chhatrapatisarkarnama

मुंबई : औरंगाबाद शहराचे नामकरण 'संभाजीनगर' करण्यावरून मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापले आहे. त्यात समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. औरंगजेब वाईट राजा नव्हता, औरंगजेबचा खरा इतिहास समोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही, असे आझमी यांनी म्हटले होते. आझमींच्या या विधानावरून आता संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhaji Raje Chhatrapati) लोणावळ्यात प्रसार माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली.

आझमी महाराष्ट्रात का राहत आहेत. असल्या माणसला पहिले महाराष्ट्राच्या बाहेर फेकले पाहिजे, असे बोलायची यांची हिंमत कशी काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) मुघलशाहीला केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून बाहेर काढण्याचे ठरवले होते. ही असली माणसे महाराष्ट्रात राहतात हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी त्यांना सांगायला हवे की तुला जर महाराष्ट्रात राहायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांचे व सगळ्या संतांचे नाव घ्यायला पाहिजे, काय त्या औरंगजेबच नाव घेतात.' असे संभाजीराजे म्हणाले.

Abu Azmi, Sambhaji Raje Chhatrapati
बारामती जिंकणं शक्य; पण पवारसाहेबांच्या...: महादेव जानकरांनी सांगितली व्यूहरचना!

तसेच, सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्राचे हे संस्कार नाही. कायदा आणखी कडक करण्यासाठी संसदेमध्ये खासदारांनी आवाज उठवला पाहिजे, असेही संभाजीराजे म्हणाले. याशिवाय, लवकरात लवकर मंत्रीमंडळ स्थापन करा. राज्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावा, असे त्यांनी यावेळी राज्य सरकारला म्हटले.

अबू आझमी म्हणाले होते, औरंगाबादमध्ये अनेक लोकांचे नाव औरंगजेब असून रावसाहेब दानवे यांचा दावा खोटा असल्याचे त्यांनी म्हटले होते. औरंगजेब वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास समोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात असल्याचेही आझमी यांनी सांगितले होते. औरंगजेबने कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये लढाई केली नाही, असेही ते म्हणाले होते.

Abu Azmi, Sambhaji Raje Chhatrapati
मुख्यमंत्री बांगरांच्या फार्म हाऊसचे उद्धाटन करणार, कावड यात्रेतही सहभागी होणार..

औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद या तीन शहरांच्या नावात मुस्लीम नाव आहे. ही तीन नावे बदलल्याने जर महाराष्ट्रातील जनतेला नोकरी मिळणार असेल त्याच बरोबर येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार असतील, विकास होणार असेल तर मी नामकरणाचे स्वागत करेन असेही आझमी म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com