Amit Shah, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Congress Vs BJP : '2029 ला महाराष्ट्रात नव्हे दिल्लीतही भाजपचं सरकार नसेल...', शाहांच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचं प्रत्युत्तर

Jagdish Patil

Mumbai News, 02 Oct : "2029 मध्ये अमित शाह (Amit Shah) दिल्लीत पण नसतील, सध्या ते स्व:ता कुबड्या घेऊन सत्तेत आहेत", अशा शब्दात विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

"यंदा राज्यात महायुतीचं सरकार येईल, पण 2029 साली एकट्या भाजपच्या (BJP) जीवावर सत्ता आणायची आहे", असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसमोर केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, "2029 मध्ये दिल्लीत भाजपचं (BJP) सरकार नसेल, सध्या ते स्व:ता कुबड्या घेऊन सत्तेत आहेत. घोटाळे करणारं हे सरकार आहे. महाराष्ट्राला हे सरकार नको आहे. कॅबिनेटमध्ये सरकार दिवाळीखोरी करत असल्याची नोंद आहे. त्यामुळे आगामी काळात सत्ता तर दूर यांना राज्यात फिरणेही अवघड होईल."

तसंच 2029 स्वप्न पाहणं दूरच पण आता पुढील 10 ते 15 वर्ष भाजप राज्याच्या सत्तेतही राहणार नाही. एवढी राज्याची जनता त्यांना वैतागली असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप दुतोंडी साप असून जिकडे भक्ष्य तिकडे जातो आणि वापर झाला की फेकून देतो असंही म्हटलं. यावेळी त्यांनी मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पडेल असा दावाही त्यांनी यावेळी केला.

"मध्यप्रदेशात अर्थ खात्याने सांगितलं लाडकी बहीण योजना चालू शकत नाही. चार महिन्यात ती बंद केली. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली. मात्र, ती इथे पण बंद होईल. महाराष्ट्रात भ्रष्टाचार 40 टक्केपर्यंत गेला आहे. भाजप ही लुटारूंची टोळी असून लुटा आणि वाटा हीच त्यांची नीती आहे," अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

अमित शाह नेमकं काय म्हणाले?

मुंबईतील कार्यकर्त्यांना सूचना देताना अमित शाह म्हणाले, "जे सरकार काम करतं तेच निवडणुका जिंकतात, देशात आपण सलग तिसऱ्यांजा सरकार बनवलं आहे. आता निराशा झटकून टाका, कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका, महाराष्ट्रात महायुतीचेच (Mahayuti) सरकार येईल. मात्र, 2029 च्या विधानसभेत एकट्याच्या जीवावर सत्ता आणायची आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT