Raj Thackeray : ...असल्यांचा महाराष्ट्रात सुळसुळाट झालाय! महात्मा गांधी जयंतीदिनी राज ठाकरेंचे फटकारे

Mahatma Gandhi Birth Anniversary Maharashtra : देशभरात महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे.
Raj Thackeray, Mahatma Gandhi
Raj Thackeray, Mahatma GandhiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी महाराष्ट्रातील वाचाळवीरांना फटकारे लगावले आहेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाल्याचे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. आज महात्मा गांधींची जयंती. 'बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला', असं गांधीजी म्हणायचे. त्यांच्या या म्हणण्यातला 'मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर....' याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे, असे ठाकरेंनी म्हटले आहे.

Raj Thackeray, Mahatma Gandhi
Caste Census : मुंबईतील ‘INDIA’ च्या बैठकीबाबत केंद्रीय मंत्र्यांचा गौप्यस्फोट; तेव्हा राहुल गांधी गप्प का होते?

प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं, हे सध्या सुरु आहे. आणि महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाल्याचे ठाकरेंनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

ठाकरेंनी माध्यमे आणि सोशल मीडियाकडेही बोट दाखवले आहे. हे होतंय कारण माध्यमं अशा वाचाळवीरांना प्रसिद्धी देतात. त्यात भर पुन्हा सोशल मीडियाची, असे राज ठाकरे म्हणतात. या सगळ्यात ठेहराव निघून जातो, विचार उरत नाही. त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता, पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.

Raj Thackeray, Mahatma Gandhi
Ajit Pawar: राष्ट्रवादीतील बंड म्हणजे कहीं पे निगाहे, कहीं पे इशारा; अजितदादा तोडगा काढणार

गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्या नंतर 75 वर्षांनी देखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचं महत्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणे, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना व्यक्त करत राज ठाकरेंनी महात्मा गांधींना अभिवादन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com