BMC Elections Raj Thackeray Uddhav Thackeray devendra fadnavis sarkarnama
मुंबई

Mumbai Municipal Results : सर्वात मोठी बातमी! ठाकरेंनी मुंबई गमावली, भाजपचाच महापौर; शिंदेंची दमदार कामगिरी!

BJP win Mumbai Municipal Thackeray defeated : भाजप तब्बल 80 जागांवर तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 22 जागांवर आघाडीवर आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 55 जागांवर आघाडीवर आहे.

Roshan More

Mumbai Municipal Results : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने 100 चा आकडा पार केला आहे. तर, शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे आणि मनसे मिळून 65 जागांवर स्थिर आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर भाजपचाच होणार, हे स्पष्ट झाले असून ठाकरेंनी मुंबई महापालिका गमावली आहे.

भाजप तब्बल 80 जागांवर तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 22 जागांवर आघाडीवर आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 55 जागांवर तर, मनसे आठ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसची कामगिरी देखील खालावली असून अवघ्या 9 जागांवर काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजप-शिंदेंची शिवसेनेची सत्ता येणार असल्याचे चित्र आहे.

शिंदेंची ताकद वाढली

मुंबईमध्ये ठाकरेच अशी हवा होती. मात्र, भाजपच्या साधीने निवडणूक लढणाऱ्या एकनाथ शिंदेंनी तब्बल 25 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. या आघाडीचा थेट फटका ठाकरेंच्या उमेदवारांना बसला आहे.

प्रथमच भाजपचा महापौर

भाजप शिवसेनेसोबत मुंबईत महापालिकेत अनेकदा सत्तेत होती. मात्र, त्यांना उपमहापौर पदावर समाधान मानावे लागत होते. या वेळी मात्र यावेळी शिंदेंसोबत लढत भाजपने एकहाती वर्चस्व स्थापन करत सत्ता मिळवली आहे. त्यामुळे प्रथमच भाजपचा महापौर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT