PMC Election
PMC ElectionSarkarnama

Pune Election Result 2026: सुरुवातीच्या कलांमध्ये पुण्यात भाजप आघाडीवर; राष्ट्रवादीला किती जागा? काँग्रेसने खातं उघडलं नाही

PMC Election Results 2026: पुणे महापालिका निवडणुकीच्या यंदा ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत.
Published on

Pune Municipal Corporation Election 2026 result 16 JAN 2025: राज्यातील महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. पहिला कलांमध्ये भाजप 38 जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने पुण्यात अद्याप खाते उघडलेले नाही.

पुणे महापालिका निवडणुकीच्या यंदा ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. प्रभाग क्रमांक ३५ मधील भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे.

१६३ जागांसाठी आता निवडणूक होत आहे. पुरुष मतदारांची संख्या ४४ लाख ९१ हजार ६८, तर महिलांची संख्या ही ४१ लाख ५५ हजार ३३० इतकी आहे. पुण्यात भाजपने आघाडी घेतली असून मध्यवर्ती भागात असणाऱ्या प्रभाग २५ मधून पहिल्या फेरीत भाजपचे संपूर्ण पॅनल आघाडीवर आहे.

PMC Election
Kolhapur Mahapalika Election: कोण मारणार मैदान? १८ माजी नगरसेवक आमने-सामने; सतेज पाटील, महाडिकांची प्रतिष्ठा पणाला

पुणे महापालिका निवडणुकीसाठी अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजप , शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. अनेकजण राजकीय पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत.

पुणे

भाजप-३८

राष्ट्रवादी- ५

कांग्रेस- ०

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com