Palghar Politics Nagar Parishad Election Result  sarkarnama
मुंबई

BJP Vs Shivsena : भाजप-शिवसेना भिडले; पालघर जिल्ह्यात कुणाची सत्ता? निकालाने सगळेच अंदाज फेल, चार नगरपरिषदे पैकी...

Palghar Politics Nagar Parishad Election Result : पालघर नगरपरिषदेवर नगरसेवक पदांमध्येही शिवसेनेने मुसंडी मारली असून शिवसेनेचे 19 नगरसेवक निवडून आले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

निखिल मेस्त्री

Palghar News : पालघर जिल्ह्यात महायुतीमधील मित्र पक्ष भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत होते. जिल्ह्यामधील जव्हार आणि वाडा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावर भाजपचे उमेदवार निवडून आले असले तरी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या डहाणू आणि पालघर नगरपरिषद भाजपच्या हातून निसटल्या आहेत. या दोन्ही नगरपरिषदांवर शिवसेनेने मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे.

पालघर नगरपरिषदेवर शिवसेनेचे उत्तम घरत विजयी झाले आहेत. डहाणू नगर परिषदेमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा पराजय झाला असून शिवसेनेचे राजू माच्छी विजयी झाले आहे. जव्हार नगरपरिषदेमध्ये भाजपच्या पूजा उदावंत विजयी झाल्या असून वाडा नगरपंचायतीवर भाजपच्या रीमा गंधे विजयी झाल्या आहेत.

पालघर नगरपरिषदेवर नगरसेवक पदांमध्येही शिवसेनेने मुसंडी मारली असून शिवसेनेचे 19 नगरसेवक निवडून आले आहेत. या नगर परिषदेवर भाजपचे आठ तर ठाकरे गटाचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत.

जव्हार नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षसह नगरसेवक पदावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. येथे भाजपचे 14 नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. वाडा नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदावरही भाजपने चांगलेच प्राबल्य मिळवले आहे. येथे भाजपचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत.

डहाणून भाजपचे 17 नगरसेवक

शिवसेनेचे तीन, ठाकरे गटाची एक, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाची एक, तर काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला आहे. डहाणूमध्ये भाजपा विरुद्ध लढण्यासाठी अजित पवार व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस सह शिवसेनेने हात मिळवणे करून आघाडी तयार केली होती.

या आघाडीचे 10 नगरसेवक निवडून आले डहाणू नगरपरिषदेवर 17 नगरसेवक भाजपाची निवडून आले असले तरी नगराध्यक्षपदावर शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पालघरमध्ये शिवसेनेची सत्ता असल्याचे पुन्हा एकदा या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT