Veer Savarkar and Rahul Gandhi Sarkarnama
मुंबई

Veer Savarkar and Rahul Gandhi : राहुल गांधींना 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचं तिकीट पाठवून भाजपचा टोला, म्हटले...

Mayur Ratnaparkhe

Swatantra Veer Savarkar movie : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांच्याकडून आतापर्यंत अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत विविध वादग्रस्त टिप्पण्या करण्यात आल्या आहेत. ज्यावरून मोठा गदारोळही झाला आहे. तसेच, भाजपकडून राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिकाही घेतली गेली आहे. मात्र, राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांची सावरकरांबद्दलची भूमिका बदललेली नाही.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अभिनेत्रा रणदीप हुड्डा यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. ज्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. शिवाय या चित्रपटास प्रतिसादही चांगला मिळताना दिसत आहे. आता या चित्रपटावरून भाजपने(BJP) काँग्रेसला डिवचल्याचे दिसून आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजंदर सिंग तिवाना यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची तिकिटं राहुल गांधी, सोनिया गांधी(Sonia Gandhi) आणि प्रियंका गांधी यांना पाठवली आहेत. शिवाय, हा चित्रपट त्यांना बघायला सांगून यामुळे तुमचे डोळे उघडतील असा टोलाही लगावला आहे.

तेजंदर सिंग तिवान यांनी ट्विटरवर व्हिडिओद्वारे म्हटले आहे की, 'राहुल गांधींजी(Rahul Gandhi) जय श्रीराम! मी तुमच्यासाठी, सोनिया गांधींसाठी आणि प्रियंका गांधींसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे तीन तिकटं पाठवली आहेत. तुम्ही तर देशातील परमनंट विरोधी पक्षाचे नेते आहात, तर तुम्हाला आपल्या देशाच्या इतिहासाची माहिती असायलाच हवी.'

याशिवाय 'माझा दावा आहे की, हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमचे व तुमच्या कुटुंबाचे डोळे उघडतील आणि तुमचं मस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ झुकेल. तर या रविवारी आपल्या मोहब्बतच्या दुकानाला तीन तासांसाठी कुलूप लावा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहून या. जय श्रीरा,' असंही तिवाना म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT