devendra fadnavis
devendra fadnavis sarkarnama
मुंबई

फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिका गेली तरी चालेल; पण...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) सध्या अटकेत आहेत. जमीन व्यवहारात प्रकरणात त्यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने (BJP) आझाद मैदानावर मोर्चा काढला. आझाद मैदानापासून सुरु झालेल्या मोर्च्याला मेट्रो सिनेमाजवळ पोलिसांनी अडवले. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), आमदार आशिष शेलार, नितेश राणे यांच्यासह अनेक भाजप नेते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलना दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी सवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. राजीनाम्याची मागणी आम्ही सुरुच ठेवणार आहोत. सरकारला त्यांचा राजीनामा घ्यावा लागले. यावेळी त्यांना पत्रकारांनी पश्न विचारला की मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप हे आंदोलन करत आहे का, त्यावर फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिका गेली तरी चालेल आम्हला फरक पडत नाही. आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे, असे सांगत त्यांनी मलिक यांचा राजीनामा सरकारला घ्यावाच लागेल असा इशारा दिला.

मोर्चेकऱ्यांनी विधानभवनावर धडकण्याचा अट्टाहास धरल्यानंतर पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून निघून जाण्याचे आव्हान केले होते. मात्र, मोर्चेकरी घटनास्थळी आंदोलन करीत होते. या आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नवाब मलिकांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, मलिक यांच्या विरोधातील आंदोलनामध्ये भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या मोर्चासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. ४ मार्च) चर्चगेट येथे बैठक घेऊन या मोर्चाचे नियोजन केले होते. त्यातच भाजपच्या मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांना मोच्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आक्रमक झाली आहे. त्याला टक्कर देण्यासाठी भाजपनेही जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT