Maharashtra Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे आणि भाजप पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्रातील दौरे वाढले आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पुण्याचा दौरा केला. त्यामुळे भाजपची महाराष्ट्रातील मिशन 45 साठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मिशन ४५ प्लससाठी भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. अशातच, एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र भाजपमधील अनेक बड्या चेहऱ्यांना लोकसभेचे तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे.
आगामी 2024 लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या मिशन 45 साठी सोलापूरमधून राम सातपुते, ठाण्यातून संजय केळकर किंवा रवींद्र चव्हाण, मुंबईतून राहुल नार्वेकर, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, जळगावमधील रावेरमधून गिरीश महाजन यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुलडाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जागांसाठीही भाजपने आपली ताकद पणाला लावली आहे. या ठिकाणी असलेल्या 18 विधानसभा मतदारसंघांवर भाजप विशेष लक्ष देणार आहे.
त्याचबरोबर या अभियानासाठी भाजपने 12 प्रमुख नेत्यांची निवड केली आहे. प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत, असे गणित आहे. आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे प्रमुख नेते आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या भाजपचे केंद्रीय मंत्री महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचे दौरे करून कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 16 विधानसभा मतदारसंघांची निवड केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे भाजपने निवडलेल्या दहा जागांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे.
एका वृत्त वाहिनीच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज आहे. जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौरा करून खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर मुंबईतही काही ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत गेल्या पाच वर्षांतील कामगिरी पाहूनच भाजप प्रत्येक खासदाराला तिकीट देणार आहे. नावांवर चर्चा होऊन काही दिवसांत यादी जाहीर केली जाईल.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.