Rajasthan Assembly Survey : ताज्या सर्व्हेनुसार भाजप-काँग्रेसमध्ये '0.6 टक्के' मतांचा फरक; राजस्थानची लढत अत्यंत चुरशीची!

Rahul Gandhi Vs Narendra Modi : कुणाला किती जागा मिळणार?
Narendra Modi Rahul Gandhi
Narendra Modi Rahul Gandhi Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Rajasthan Politics : राजस्थान राज्याच्या विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानेही सर्व शक्ती पणाला लावली आहे. एकीकडे राजस्थानमध्ये होणाऱ्या दर पाच वर्षांनी सत्ता परिवर्तनाची परंपरा बदलण्यासाठी अशोक गेहलोत प्रयत्न करणार आहेत, तर दुसरीकडे भाजप पंतप्रधान मोदींचा चेहरा समोर ठेवून राजकीय वातावरण बदलण्यालाठी ताकद लावणार आहे. मात्र, त्याआधी नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून दोन्ही पक्षांमधील लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मतांमधील फरक फक्त 0.6 टक्क्यांचा

ईटीजी टाईम्स नाऊ नवभारतने शुक्रवारी (दि. 29 सप्टेंबर) सर्वेक्षणाच्या जाहीर केलेल्या निष्कर्षानुसार, राजस्थानमध्ये आज निवडणूक झाल्यास काँग्रेस आणि भाजपामध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. भाजपाला 42.80 टक्के मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर काँग्रेसला 42.20 टक्के मते मिळू शकतात. या सर्वेक्षणात दोन्ही पक्षांच्या मतांमध्ये केवळ o.6 टक्के फरक असल्याचा अंदाज आहे. याच संस्थेने जुलैमध्ये सर्वेक्षण केले होते, तेव्हा भाजपाला 43.30. टक्के आणि काँग्रेसला 41.80. टक्के मते मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता, तर मागील 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 40.64 टक्के मते मिळाली होती, तर भाजपच्या पदरात 39.08 मते पडली होती.

किती जागा शोधत आहात?

राजस्थानच्या ढूंढाड प्रदेशात विधानसभेच्या एकूण 58 जागा आहेत. भाजपला येथे 27 ते 29 जागा मिळू शकतात, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे, तर काँग्रेसला 28 ते 30 जागा मिळू शकतात. इतर आणि अपक्षांना 0-2 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

मेवाडचा मूड काय?

मेवाड विभागात एकूण 43 जागा आहेत. या वेळीही येथे चुरशीची लढत होईल, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष 20-22 जागा जिंकू शकतात, तर इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.

मारवाडमध्ये काय वातावरण आहे?

मारवाड विभागात सर्वाधिक ६१ जागा आहेत. सर्वेक्षणानुसार या ठिकाणी भाजपाला थोडीशी आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे. भाजपला 30-32 टक्के जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 27-29 जागा मिळू शकतात. इतरांना 0-4 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

हडोती परिसरात काय होणार?

राजस्थानच्या हडोती प्रदेशात विधानसभेच्या एकूण १७ जागा आहेत. सर्वेक्षणानुसार भाजपला 8-10 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 7-9 जागा मिळू शकतात. इथे अपक्षांना एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे.

कोणाला किती जागा ?

या सर्वेक्षणानुसार भाजप अगदी थोड्या फरकाने पुढे आहे. 200 जागांच्या विधानसभेत भाजपला 95 ते 105 जागा, तर काँग्रेसला 91 ते 101 जागा मिळू शकतात. इतरांना 3-6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 100 जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ 73 जागांवर समाधान मानावे लागले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com