Loksabha Election BJP Masterplan Sarkarnama
मुंबई

Loksabha Election BJP Masterplan: आगामी निवडणुकीसाठी भाजपचा ‘मेगा प्लॅन’; लोकसभा-विधानसभा मतदारसंघात 'वॉर रूम' सुरू करणार

BJP News: राज्यातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात भाजपची निवडणूक 'वॉर रूम' महिनाभरात सुरू होणार

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपच्या विद्यमान आमदार-खासदारांना त्यांच्या मतदारसंघात 'वॉर रुम' सुरू करण्याच्या सूचना पक्षाकडून जारी करण्यात आल्या आहेत.

ज्या ठिकाणी भाजपचे आमदार-खासदार नाहीत तेथे मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नियुक्त करण्यात आले असून तेथेही 'वॉर रूम' सुरू करण्याच्या सूचना भाजपने दिल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाढवण्यासाठी आणि सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपने 'मेगा प्लॅन' तयार केला आहे.

राज्यातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात भाजपची निवडणूक 'वॉर रूम' महिनाभरात सुरू होणार असून महाजनसंपर्क अभियानही राज्यभरात भाजप सुरू करणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघात ६० हजार घरी जाऊन किमान ३० हजार नागरिकांच्या मोबाईलवर 'सरल ॲप' सुरू करण्याचा भाजपचा संकल्प आहे.

याबरोबरच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व्हॉट्सॲपचे गृप तयार करावेत आणि प्रत्येक आमदार, खासदार व निवडणूक प्रमुखाने सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत. आता जे मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना सोडले जातील, तेथेही भाजपचे निवडणूक प्रमुख असतील, आणि 'वॉर रूम'चा त्यांनाही फायदा होईल, असे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT