Delhi News: आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. सध्या मतदारसंघनिहाय आढावा घेण्यावर नेत्यांनी भर दिल्याचे पाहायला मिळत आहे.
याच अनुषंगाने आता भाजपनेही 'मास्टर प्लॅन' आखल्याचे बोलले जात आहे. चार राज्यातील भाजपच्या तब्बल 350 आमदारांना भोपाळमध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या 40 आमदारांचाही समावेश असणार आहे.
ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या ठिकाणी इतर राज्यातील आमदारांकडून सर्वे घेण्यात येणार आहे. निवडणूक पूर्व सर्व्हे करण्यासाठी या आमदारांना ट्रेनिंग दिले जाणार आहे. यामध्ये चार राज्यातील भाजपच्या 350 आमदारांचा समावेश असून 18 तारखेला हे सर्व आमदार भोपाळमध्ये पोहचणार आहेत.
ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत, त्या राज्यात इतर राज्यातील भाजपचे आमदार जाऊन सर्वे करणार आहेत. हा सर्व्हे केल्यानंतर त्याचा अहवाल वरिष्ठांना देण्यात येणार आहे. याच सर्व्हेचे ट्रेनिंग या आमदारांना दिले जाणार आहे.
तसेच निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे कोणते मु्द्दे असणार आहेत, भाजपच्या प्रचाराची रणनीती काय असणार, यासह अनेक महत्वाच्या बाबींसंदर्भात या आमदारांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
ज्या मतदारसंघात भाजपची ताकद कमी आहे, त्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करत पक्ष आणखी मजबूत होण्यासाठी त्या मतदारसंघावर फोकस करण्यासाठी आमदारांना या ट्रेनिंगदरम्यान काही महत्वाचे निर्देशही दिले जाण्याची शक्यता आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.