BMC 12 thousand Crore Scam :  Sarkarnama
मुंबई

BMC 12 thousand Crore Scam: मुंबई पालिका घोटाळा; एसआयटी'ची जबाबदारी फणसळकरांकडे

सरकारनामा ब्यूरो

BMC Covid Scam : मुंबई महानगरपालिकेच्या बारा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात संदर्भात चौकशी करण्याकरिता राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी समितीच्या प्रमुखपदी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी फणसळकर यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.

कोरोना काळात कोविड हॉस्पिटल उभारण्यात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात ईडी'कडून मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या निकटवर्तीयांची देखील चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे एकीकडे राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेली एसआयटीची आणि दुसरीकडे ईडीच्या वतीने करण्यात येत असलेल्या चौकशीचे ससे मिरे सध्या राजकीय नेते आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे.

बीएमसी'मध्ये झालेल्या 12 हजार कोटी रुपयांच्या व्यवहाराची चौकशी नक्कीच कॅग द्वारे करण्यात आले होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने एसआयटी'ची स्थापना करण्यात आली होती. आज देशातील विरोधकांची मोदीविरोधात पाटणा येथे बैठक सुरू असताना या समितीच्या प्रमुख पदाची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे हे देखील पाटणात दाखल झाले आहेत. या बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गेले असता राज्य सरकारकडून एसआयटी'द्वारे करण्यात येणाऱ्या चौकशीच्या प्रमुखपदी पोलीस आयुक्तांची नियुक्ती केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे.

मुंबई महापालिकेने (BMC) कोरोनाच्या काळात केलेल्या सुमारे 12 हजार कोटी रुपयांच्या खर्चाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर कॅगने याबाबत पडताळणी केली. या व्यवहारात 12 हजार कोटी रुपयांची अनियमितता दिसत असल्याचे कॅगने आपल्या अहवालात नमूद केले होते. कॅगने ठपका ठेवल्यानंतर या कथित घोटाळ्याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष समिती नेमण्यास मान्यता दिली.

मुंबई पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष चौकशी समिती नेमावी, असे आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या देखरेखीखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त निशित मिश्रा, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त या अधिकाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. या एसआयटीमध्ये अन्य अधिकारी आणि कर्मचारी यांचा आवश्यकतेनुसार समावेश करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबई महानगरपालिकेतील 12 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार राज्य सरकारकडे केली होती. त्यानंतर अधिवेशनात दरम्यानच राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची कॅगद्वारे चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

एसआयटीच्या रडारवर महापालिकेचे अधिकारी येणार की राजकारणी येणार? असा सवाल करण्यात येत आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतील व्यवहारांची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याने ठाकरे गटाचे धाबे दणाणले असल्याचं सांगितलं जात आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार हा ठाकरे गटासाठी निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकतो असंही सांगितलं जात आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT