Iqbal Singh Chahal sarkarnama
मुंबई

BMC News : राजकीय नेत्यांनंतर ED च्या रडारवर आता प्रशासकीय अधिकारी ; महापालिका आयुक्तांना समन्स

iqbal singh chahal news : कोरोना काळात क्वारंटाईन सेंटर उभारणीत पालिकेकडून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप चहल यांच्यावर आहे.

सरकारनामा ब्युरो

iqbal singh chahal: मुंबई महापालिका (BMC)आयुक्त इकबाल सिंह चहल( iqbal singh chahal) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहे. कोरोना काळात क्वारंटाईन सेंटर उभारणीत पालिकेकडून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप चहल यांच्यावर आहे.

सोमवारी (16 जानेवारीला) ईडीने चहल यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चहल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत आरोप केला होता. चहल यांनी कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेल्या वेगवगेळ्या कामांच्या टेंडरमध्ये गैरव्यवहार केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

सोमवारी कागदपत्रांसह सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी या, असा आदेश ईडीने चहल यांना समन्सच्या माध्यमातून दिला आहे. आतापर्यंत राजकीय व्यक्ती ईडीच्या रडारवर होत्या. आता ईडीनं आपला मोर्चा आपला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वळविल्याचे दिसते.

आझाद मैदानात पोलीस ठाण्यात गेल्यावर्षी किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती, या तक्रारीत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या नावाचा उल्लेख होता. सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांची मालकी असलेल्या कंपनीच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांची नावे सोमय्यांनी या प्रकरणात घेतली होती. या गैरव्यवहारात इंटरनल हेल्थ केअर मॅनेजमेंट सर्विस लिमिटेड या सुजीत पाटकर यांच्या कंपनीचा समावेश असल्याचा आरोप करत सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी ईओडब्ल्यू तपास करत असताना त्यात आता ईडीने एन्ट्री केली आहे.

दरम्यान, इकबाल सिंह चहल( iqbal singh chahal) यांना समन्स बजावल्याच्या चर्चांवर खुद्द चहल यांनी खुलासा केला आहे. असे कोणतेही समन्स मिळाल्याची मला कल्पना नसल्याचे चहल यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT