Mumbai Municipal Corporation  Srakarnama
मुंबई

BMC Election 2025: मुंबईत शिवसेना-भाजपचा जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला; दोन्ही पक्ष किती जागा लढणार? जाणून घ्या

BMC Election 2025: गेल्या दहा दिवसांपासून ७७ जागांसाठी अडून राहिलेलं शिवसेना-भाजपमधील जागा वाटप अखेर पूर्ण झालं आहे.

Amit Ujagare

BMC Election 2025: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपचं जागा वाटप अखेर पूर्ण झालं आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून केवळ २० जागांवर दोन्ही पक्षांमध्ये एकमत होतं नव्हतं. पण आता उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं त्याच्या पूर्वसंध्येला हा जागा वाटपाचा प्रश्न सोडवण्यात आलेला आहे.

जागा वाटपाचा तिढा सुटला

मुंबईत शिवसेना-भाजपची युतीची घोषणा आधीच झाली होती. त्यानंतर सुरुवातीलाच २२७ पैकी १५० जागांवर दोन्ही पक्षांची सहमती झाली होती, पण उर्वरित ७७ जागांबाबत दोघांमध्ये चर्चा सुरु होती. गेल्या दहा दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या फेऱ्या होत होत्या, त्यात काही जागांवर सहमती झाली. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून केवळ २० जागांवर सहमती होत नव्हती. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यानं शिवसेना-भाजपचं अद्यापही मुंबईतल्या जागा वाटप जाहीर होत नसल्यानं कार्यकर्ते आणि नेत्यांची धाकधूक वाढली होती. पण आता हे जागा वाटप पूर्ण झाल्यानं सर्वांना दिलासा मिळाला आहे.

किती जागा झाल्या फानयल?

नव्या फॉर्म्युल्यानुसार, मुंबई महापालिकेसाठी २२७ जागांपैकी भाजप १३७ जागा लढवणार आहे, तर शिवसेना ९० जागा लढवेल. शिवसेनेनं सुरुवातीला १२५ जागांचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला होता. पण चर्चेदरम्यान तो मान्य होऊ शकला नाही, त्यामुळं सेनेला ९० जागांवरच समाधान मानावं लागलं. पण आता दोन्ही पक्ष मिळून १५० पेक्षा अधिक जागा जिंकून मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करु आणि महायुतीचा मराठी महापौर करु, असा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे व्यक्त केला.

रिपाइंला किती जागा?

दरम्यान, इतर मित्र पक्षांना भाजप आणि शिवसेना यांच्या वाटेला आलेल्या जागांमधून जागा देणार आहेत. भाजप-शिवसेनेसोबत रिपाइं (आठवले) हा पक्ष देखील युतीत सहभागी आहे. पण रिपाइंला किती जागा सोडणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यानं आता उमेदवारही मोठ्या उत्साहात अर्ज भरतील, अशी माहिती सोमवारी रात्री उशीरा शिवेसना-भाजपनं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT