Nagpur Election: भाजपचं धक्कातंत्र! अनेक दिग्गजांना बसवलं घरी; फडणवीस, गडकरींच्या कट्टर समर्थकांचा समावेश

Nagpur Election: प्रस्थापितांमध्ये खळबळ, तीन ते चार टर्म नगरसेवक राहिलेल्यांना सर्वाधिक फटका
Nitin Gadkari, Devendra Fadnavis
Nitin Gadkari, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Election: महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत यंदा अनेक दिग्गजांना घरी बसवले. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कट्टर समर्थकांचा समावेश आहे. तीन ते चार टर्म नगरसेवक राहिलेल्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

Nitin Gadkari, Devendra Fadnavis
Ravindra Dhangekar: शिवसेना-भाजपच्या युतीचा अद्यापही स्पष्टता नाही! अजित पवारांच्या भेटीनंतर धंगेकर म्हणाले...

भाजपने धक्का दिलेल्या नगरसेवकांमध्ये मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक व नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त संजय बंगाले, माजी महापौर अर्चना डेहनकर, स्थायी समितीचे माजी सभापती प्रकाश भोयर, स्थायी समितीचे माजी सभापती व सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, ज्येष्ठ सदस्य चेतना टांक, माजी नगरसेविका वर्षा ठाकरे, माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

Nitin Gadkari, Devendra Fadnavis
Ravindra Dhangekar: मुलाला तिकीट मिळावं म्हणून अजित पवारांची घेतली भेट? धंगेकरांनी स्पष्टच सांगितलं; भाजपविरोधात थोपटले दंड

मागील निवडणुकीत भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. सत्ता आल्यानंतर सुमारे ८० टक्के नगरसेवक प्रभागात फिरकलेच नाहीत. महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर निष्क्रिय राहिलेल्या नगरसेवकांच्या तिकिट कापण्याचा इशारा भाजपने दिला होता, तो खरा ठरला आहे. भाजपने बंडखोरीच्या भीतीने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. मात्र ज्यांना तिकिटे द्यायचे होते त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात बोलवून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. उद्या सर्वच उमेदवार उमेदवारी दाखल करणार आहेत. कुठलाही गाजावाजा न करता उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Nitin Gadkari, Devendra Fadnavis
Ravindra Dhangekar: मोठी बातमी! रविंद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; पुण्यातील बंगल्यावर मोठ्या घडामोडींना वेग

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विक्की कुकरेजा, बाल्या बोरकर, बंटी कुकडे, माजी महापौर मायाताई इवनाते, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रगती पाटील यांना मात्र आपले तिकीट राखण्यात यश आले आहे. भाजपने उमेदवारी देण्यापूर्वी इच्छुक तसेच संभाव्य उमेदवाराचा सर्वे केला होता. याशिवाय महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतरही नगरसेवकांना आपले कार्यालय सुरू ठेवण्याचे निर्देश देऊन त्यांना नागरिकाच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही अनेकांनी कार्यालय सुरू केले नाहीत.

Nitin Gadkari, Devendra Fadnavis
Pune NCP Alliance: पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी पवार कुटुंब आलं एकत्र! युती मागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या

नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत अशा सर्वांच्या तिकिटे कापण्यात आल्याचा दावा भाजपतर्फे केला जात आहे. अद्यापही ३५ जागांवर भाजपात उमेदवारांच्या नावावरून एकमत झालेले नाही. रात्री उशिरा नितीन गडकरी यांच्या घरी परत एकदा भाजपचे आमदार आणि कोअर समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असल्याचे समजते. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला होता. यापैकी काहींच्या नावाला भाजपातूनच विरोध होत असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com