Raj Thackeray, Uddhav Thackeray, Kirit Somaiya Sarkarnama
मुंबई

BMC Election update : ठाकरेंना भिडणाऱ्या किरीट सोमय्यांच्या लेकाचा विजय निश्चित? सेना-मनसेचा उमेदवारच नाही, महत्वाची अपडेट

Kirit Somaiya son : नील सोमय्या यांच्या प्रभागात वंचित बहुजन आघाडीसह ९ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, प्रमुख पक्षाचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने सोमय्या यांचे पारडे आता जड मानले जात आहे.

Rajanand More

Mumbai civic polls : महाविकास आघाडीची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जणू मोहिम उघडली होती. त्यांना थेट भिडणारे भाजपमधील ते एकमेव नेते होते. आघाडी सरकारविरोधात त्यांनी रान उठविले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे विरूध्द सोमय्या असा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार, अशी शक्यता होती. पण ती फोल ठरली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत बाजी मारण्यासाठी उद्धव ठाकरे व राज्य ठाकरे या दोन्ही बंधूंनी कंबर कसली आहे. त्यांच्यासमोर भाजप-शिवसेना युतीचे तगडे आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागाला महत्व प्राप्त झाले आहे. किरीट सोमय्या यांचे पुत्र नील यांना मुंबईतील मुलुंड भागातील प्रभाग क्रमांक १०७ मधून भाजपची उमेदवारी मिळाली आहे.

नील सोमय्या यांच्याविरोधात ठाकरेंकडूनही मातब्बर उमेदवार उतरविला जाण्याची शक्यता होती. पण तसे काहीच घडलेले नाही. खुद्द किरीट सोमय्या यांनीच सोशल मीडियात पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे सेना यूबीटी, राज ठाकरे मनसे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी प्रभाग क्रमांक १०७ मधून उमेदवार दिले नाहीत. गॉड इज ग्रेट, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे मुलूंड भागातील अन्य प्रभागांमध्ये ठाकरे बंधूंसह शरद पवार किंवा काँग्रेसचेही उमेदवार आहेत. ठाकरेंच्या युतीमध्ये प्रभाग क्रमांक १०७ हा शरद पवारांच्या वाट्याला आला होता. तिथून त्यांनी हंसराज दनानी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. परिणामी, या प्रभागात प्रमुख पक्षाचा उमेदवार उरलेला नाही.

नील सोमय्या यांच्या प्रभागात वंचित बहुजन आघाडीसह ९ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, प्रमुख पक्षाचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने सोमय्या यांचे पारडे आता जड मानले जात आहे. त्यांचा विजय निश्चित मानला जाऊ लागला आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानलो जातो. किरीट सोमय्या या भागाचे माजी खासदार आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू आणि शरद पवारांकडून आता वंचित किंवा अन्य अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला जाणार की नील सोमय्या यांना वाट मोकळी करून दिली जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT