Varsha Gaikwad Sarkarnama
मुंबई

BMC Election Result : निकालानंतर काँग्रेसमध्ये खळबळ; बड्या नेत्यानं घातला पहिला घाव, वर्षा गायकवाड राजीनामा देणार?

Varsha Gaikwad news : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी थेट पक्षाच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Rajanand More

BMC Election congress politics : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप-शिवसेना युतीने ठाकरे बंधूंचा पराभव केल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईवर भाजपचा झेंडा फडकला आहे. ठाकरेंनीही मिळालेल्या जागांवर समाधान मानत यापुढेही लढाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, मुंबईत चौथ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे.

मुंबईत काँग्रेसला २४ जागा मिळाल्या आहेत. खरंतर महायुती आणि ठाकरेंच्या लाटेत काँग्रेसचा निभाव लागेल की नाही, याबाबत काँग्रेस नेत्यांच्या मनातच साशंकता होती. पण काँग्रेसने एकनाथ शिंदेच्या तोडीस तोड कामगिरी करत २४ जागांपर्यंत मजल मारली अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण या जागांवरूनच आता पक्षातील अंतर्गत वाद काही तासांतच चव्हाट्यावर आला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी थेट पक्षाच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पक्षाला अपेक्षित न मिळण्यास नेतृत्वच जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रभावी रणनीतीचा अभाव आणि कमकुवत संघटनेमुळे मुंबईत पक्षाची ताकद कमी झाल्याचा आरोप करत जगताप यांनी थेट गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पक्षाला जागा कमी मिळाल्या आहेत. या निकालांचे विश्लेषण केल्यास नेतृत्वातील त्रुटी स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावे, असे जगताप यांनी म्हटले आहे. जगताप यांच्या या भूमिकेमुळे पक्षात खळबळ उडाली आहे.

भाई जगताप हे मुंबई काँग्रेस माजी अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर अनेक माजी नगरसेवक पक्षाला सोडून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत गेले. त्यामुळे काँग्रेसची स्थिती दयनीय मानली जात होती. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्यामुळे पक्षाला पुन्हा अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा नेत्यांना होती. पण ती फोल ठरल्याचे एकंदरीतच जगताप यांच्या नाराजीवरून दिसत आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT