Mumbai municipal corporation election : राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. राज्यात सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक मुंबई महापालिकेची ठरणार आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे बंधून एकत्रितपणे निवडणूक लढण्याची शक्यता. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र, निवडणूक जाहीर होताच घडामोडींना वेग आला असून खासदार संजय राऊतही सक्रीय झाले आहेत. आज राज ठाकरेंचे निवासस्थानी केंद्रस्थानी राहणार आहे.
मागील काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने संजय राऊत सक्रीय राजकारणापासून दूर होते. नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचारातही ते दिसले नाही. मात्र, महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांनी चक्रं फिरविण्यास सुरूवात केली आहे. आज सकाळीच पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत महत्वाचे विधान केले आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक महापालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेची युती होणार असल्याचे राऊत यांनी आज सांगितले. यापूर्वीच त्यावर शिक्कोमोर्तब झाले आहे. या पत्रकार परिषदेनंतर राऊतांनी थेट राज ठाकरेंचे निवासस्थान असलेले ‘शिवतीर्थ’ गाठले.
संजय राऊत यांच्यासोबत आमदार अनिल परबही आहेत. आज शिवतीर्थवर युतीबाबत अंतिम बोलणी होण्याची शक्यता आहे. तसेच जागावाटपावरही चर्चा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडी तसेच दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रित आणण्यात राऊत यांची मध्यस्थी महत्वाची मानली जाते. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते आजारपणातून पुन्हा सक्रीय झाले आहेत.
दोन्ही ठाकरे बंधूंसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई असल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीत दोघांच्याही पक्षाची दाणादाण उडाली. उद्धव ठाकरेंना केवळ २० आमदार निवडून आणता आले. तर राज ठाकरेंना त्यांच्या मुलासह एकही आमदार निवडून आला नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबई महापालिकेची निवडणूकही पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे विधानसभेतील पराभवाची नामुष्की महापालिकेत टाळण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार असल्याचे मानले जात आहे. पुढील आठवडाभरात युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.