Money Laundering Case : राहुल, सोनिया गांधींना मोठा दिलासा; कोर्टाकडून ED ला जोरदार झटका

National Herald case : गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने केवळ मनी लॉन्ड्रिंगचा तपासच नाही तर आरोपपत्रही सादर करणे योग्य नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.
Sonia Gandhi and Rahul Gandhi
Sonia Gandhi and Rahul Gandhi sarkarnama
Published on
Updated on

Delhi court order : देशभरात गाजत असलेल्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने सक्तवसुली संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाकडे गांधी कुटुंबाला मिळालेला मोठा कायदेशीर विजय म्हणून पाहिले जात आहे.

काय म्हटले कोर्टाने?

ईडीने काही दिवसांपूर्वीच राहुल, सोनिया गांधींसह अन्य काही जणांवर नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी कोर्टात मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आरोपपत्र दाखल केले होते. त्यामुळे या दोघांच्या कायदेशीर अडचणी वाढणार असल्याची चर्चा होती. या आरोपत्रावर कोर्टात सुनावणी झाली. त्यावर आदेश देताना कोर्टाने ईडीला चांगलेच फटकारले.

कोर्टाने आदेशात म्हटले आहे की, मनी लॉन्ड्रिंगचा तपास आणि त्याच्याशी संबंधित आरोपपत्राची प्रक्रिया आता मान्य करता येणार नाही. कारण अद्याप या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. सीबीआयने आतापर्यंत मुळ गुन्हा (Predicate Offence) दाखल केलेला नाही. त्यानंतरही ईडीने तपास सुरू ठेवला, असे सांगत कोर्टाने आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला.

Sonia Gandhi and Rahul Gandhi
ZP Election update : ZP निवडणुकीबाबत सर्वात मोठी बातमी; केवळ ‘त्या’ जिल्हा परिषदांचीच निवडणूक होणार, आयोगानेच केलं शिक्कामोर्तब

गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने केवळ मनी लॉन्ड्रिंगचा तपासच नाही तर आरोपपत्रही सादर करणे योग्य नाही. एखाद्या खासगी व्यक्तीकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाची दखल घेणे कायदेशीरदृष्ट्या स्वीकारले जाणार नाही, असेही कोर्टाने आदेशात स्पष्ट केले आहे.

Sonia Gandhi and Rahul Gandhi
Ajit Pawar: फडणवीस मैत्रीपूर्ण लढत म्हणताच अजितदादांची दोस्तीत कुस्ती; भाजप-शिवसेनेला दिला धक्का

कोर्टाने म्हटले की, ‘प्रकरणाच्या या टप्प्यावर आपण आरोपांमधील सत्यतेबाबत कोणतीही टिप्पणी करणार नाही. केवळ कायदेशीर प्रक्रियेच्या वैधतेबाबत निकाल देत आहोत.’ कोर्टाचा हा आदेश ईडीसाठी मोठा झटका आहे. तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह सात जणांना दिलासा देणारा आहे.

ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर राजधानीतील राजकीय वातावरणही तापले होते. भाजपकडून गांधी कुटुंबासह काँग्रेसवर निशाणा साधला जात होता. त्याला काँग्रेस नेत्यांकडून प्रत्युत्तरही देण्यात आले. पण आता कोर्टाच्या या आदेशामुळे काँग्रेस नेत्यांकडून भाजपवर जोरदार पलटवार केला जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com