BMC Election
BMC Election  sarkarnama
मुंबई

BMC NEWS : कार्यकर्त्यांचा राडा टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं उचलले 'हे' मोठे पाऊल

सरकारनामा ब्युरो

BMC NEWS : मुंबई महापालिकेत असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यालयावरून (Shivsena Office)ठाकरेगट आणि शिंदेगटात राडा झाल्याचं बुधवारी पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या प्रशासन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. याचा दणका सर्व पक्षाना बसला आहे.

शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर दावा केल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात बुधवारी एकच राडा झाला. शिवसेनेच्या दोन्ही गटाने शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. पोलिस आणि मुंबई महापालिकेच कर्मचारी यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही गटातील तणाव निवळला. पण शिंदे गटाने या कार्यालयावर ताबा मिळवला आहे. मुंबई महापालिकेतील शिंदे-ठाकरे गटाच्या राड्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांना एक वेगळीच भीती सतावत आहे.

बुधवारी पक्ष कार्यालयावर शिंदेगटाने ताबा मिळवल्यानंतर शिंदेगटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “जिथे आवश्यकता आहे महाराष्ट्रात तिथे-तिथे शिवसेना कार्यालयावर जाऊन करेक्ट कार्यक्रम करणार आणि आम्ही ताबा मिळणार!”, असं भरत गोगावले म्हणालेत.

पक्ष कार्यालयावरुन राडा होऊ नये, यासाठी मुंबई प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. संभाव्य वाद टाळण्यासाठी महापालिकेने आपल्या इमारतीमधील सर्व पक्षाचे कार्यालये सील करण्यात आले. याबाबत संबधित कार्यालयावर नोटीस लावण्यास आली आहे.

बुधवारी शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिंदे गटाचे राहुल शेवाळे, शितल म्हात्रे, नरेश म्हस्के आदी नेते पाहायला मिळाले. या घटनेची कुणकुण ठाकरे गटाच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना लागताच कार्यालयात हजर झाले. त्यावेळी दोन्ही गटात एकच राडा झाला, तर धक्काबुक्की देखील पाहायला मिळाली.

मुंबई महापालिकेतील शिंदे-ठाकरे गटाच्या राड्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांची सावध भूमिका घेतली आहे. आज गुरुवारी ठाकरे गटाचे नगरसेवक पालिकेच्या मुख्यालयात जमणार आहेत. या बैठकीत पुढील रणनीतीबाबत चर्चा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT