मुंबई : बॉलिवूड गायक आणि संगीतकार (Bollywood) बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांचे आज बुधवारी (ता.16 फेब्रुवारी) निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते. मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. बप्पी लहिरी यांचे अनेक किस्से व आठवणी आहेत. असाच एक किस्सा मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निवासस्थानी घडला होता. याबाबत खुद्द बप्पीदाने काही वर्षापुर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. मातोश्रीवर आलेल्या पॉपस्टार मायकल जॅक्सनने (popstar Michael Jackson) बप्पीदांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनची स्तुती केली होती. त्यावेळी बप्पीदांना इच्छा झाली की इतक्या मोठ्या स्टारने स्तुती केली चला त्याला ही चेन भेट म्हणून देऊया मात्र, तरी सुद्धा एका खास कारणामुळे त्याना ती चेन देता आली नव्हती.
बप्पी लहिरी यांची 'डिस्को किंग' शिवाय गोल्डमॅन अशीही एक वेगळी ओळख होती. एकदा पॉपस्टार मायकल जॅक्सन हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी आला होता. त्यावेळी तिथे बप्पीदाही उपस्थित होते. त्यावेळी बाळासाहेबांनी बप्पीदांची ओळख मायकल जॅक्सनशी करून दिली. त्यावर जॅक्सनने मी बप्पीदांना ओळखतो असे सांगितले आणि मी त्यांची अनेक गाणीही ऐकल्याचे जॅक्सनने बाळासाहेबांना सांगितले. त्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या यादरम्यान मायकल जॅक्सनची नजर बप्पीदांच्या गळ्यातील आकर्षक दिसणाऱ्या सोन्याच्या चेनवर गेली आणि त्याने चेन खूपच सुंदर असल्याची स्तुती केली. यावेळी लगेचच बप्पीदांच्या डोक्यात आले की, जॅक्सनला ही चेन आवडल्याने त्याला भेट म्हणून लगेचच देऊन टाकावी. मात्र, त्यांनी तसे केले नाही. यामागे सुद्धा एक कारणा होत. ही सोन्याची चेन बप्पीदांना त्यांच्या पत्नीने भेट म्हणून दिली होती. आणि या चेनमध्ये गणपतीचं एक लॉकेट होते. बप्पीदा हे धार्मिक आणि गणपतीचे भक्त होते. यामुळे बाप्पा आपले रक्षण करतो, अशी त्यांची श्रद्धा असल्याने बप्पीदाने इच्छा असूनही जॅक्सनला आपल्या गळ्यातील चेन भेट म्हणून जॅक्सनला दिली नाही. आपण एक धार्मीक व्यक्ती आहे. आणि जॅक्सनकडे कशाचीही कमी नाही, त्यामुळे आपल्या श्रद्धेसाठी बप्पीदाने सोन्याची चेन इच्छा असूनही दिली नसल्याचा हा किस्सा त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितला होता.
बप्पीदांनी खुप मेहनतीने बॉलिवूड गायक आणि संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवला होता. तसेच, त्यांनी आपल्या लूकची कोणी नक्कल करू नये याकरिता चक्क त्याचा पेटंट मिळवला होता. बप्पीदांचे आज निधन झाल्याने बॉलिवूड आणि संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.