पवारांनी विचारले; दोघेही राजकारण करता, तर मग घर कोण सांभाळतं?

चंद्रपुरात (Chandrapur) इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल्स प्लांट व टेक्स्टाईल पार्क उभारला गेला पाहिजे. यासाठी खासदार धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली.
Balu Dhanorkar, Sharad Pawar and Pratibha Dhanorkar.
Balu Dhanorkar, Sharad Pawar and Pratibha Dhanorkar.Sarkarnama
Published on
Updated on

नागपूर : कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. चंद्रपूर जिल्ह्यात नवीन उद्योग आणण्यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर तुम्ही खासदार, तुमची पत्नी आमदार. दोघेही राजकारणात सक्रिय आहात. तर मग घर कोण चालवतं, असा मिश्‍किल प्रश्‍न पवारांनी धानोरकरांना विचारला.

पवारांच्या (Sharad Pawar) प्रश्‍नाला खासदार धानोरकरांनी खुसखुशीत उत्तर दिले. ते म्हणाले, आमची मुलं बाहेर शिकतात. त्यामुळे घरी तशी काही समस्या नाही आणि आम्ही संयुक्त कुटुंब पद्धतीवर विश्‍वास करतो. आम्ही सर्व एकत्र राहतो. त्यामुळे मला आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी काम करण्यास पूर्ण स्वातंत्र्य मिळते. चंद्रपुरात (Chandrapur) इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल्स प्लांट व टेक्स्टाईल पार्क उभारला गेला पाहिजे. यासाठी खासदार धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी शरद पवारांची भेट घेतली. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार प्रतिभा धानोरकर, (Pratibha Dhanorkar) विदर्भ एमआयडीसी अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात उद्योगांच्या असलेल्या निकडीबाबत बाळू धानोरकर यांच्या पुढाकारातून ही बैठक झाली.

जिल्ह्यात रोजगाराची निर्मिती होण्यासाठी उद्योगधंद्यांची नितांत आवश्यकता आहे. आर्थिक सुबत्ता आल्याखेरीज या भागाचा सर्वांगीण विकास होणे कठीण आहे. या अनुषंगाने गेल्या वर्षभरापासून खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर हे दाम्पत्य जिल्ह्यात नवे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याआधी केंद्र व राज्य स्तरावरील मंत्र्यांशी सातत्याने पाठपुरावा केला. आज खासदार शरद पवार यांच्या मुख्य उपस्थितीत बैठक पार पडली. शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, पीयूष गोयल व राज्यातील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून व बैठका घेऊन प्रयत्न केले. याआधी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क उभारण्याची मागणी लोकसभेतदेखील केली होती.

Balu Dhanorkar, Sharad Pawar and Pratibha Dhanorkar.
कबड्डीच्या मैदानातही खासदार बाळू धानोरकर अव्वल...;पाहा व्हिडिओ

शरद पवार यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना चंद्रपुरात इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल्स प्लांट उभारण्याबाबत आवश्यकतांची तपासणी करण्याची सूचना केली. तसेच जिल्ह्यात उद्योग निर्मितीत राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य करा, असे सांगितले. तर टेक्सटाईल पार्क संदर्भातील मागणीबाबत दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे ठरले आहे.

चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा क्षेत्र आदिवासीबहुल आहे. या भागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यासोबतच धान, सोयाबीन ही पिके प्राधान्याने घेतली जातात. येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनादेखील टेक्स्टाईल पार्कमुळे सुगीचे दिवस येऊ शकतात. तसेच इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल प्लांटच्या माध्यमातून युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. दरम्यान बाळू धानोरकर यांनी शरद पवार यांच्या मुख्य उपस्थितीत घेतलेल्या बैठकीमुळे जिल्ह्यात नवे उद्योग निर्माण होण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com