ACB officials caught Borivali Police PSI Dnyaneshwar Parade while accepting a ₹1.30 lakh bribe. The action has caused concern in the Mumbai Police department. Sarkarnama
मुंबई

Borivali Police Bribe Case : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी चक्क पोलीस स्टेशनमध्येच दीड लाखांची 'डील' : ACB च्या कारवाईमुळे PSI चा पर्दाफाश

Borivali PSI caught accepting bribe in police station : कारवाईनंतर ACBने आरोपी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पराडेचा मोबाईल फोनही जप्त केला आहे. त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच आरोपीच्या निवासस्थानीही झडती घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

Jagdish Patil

Borivali Police Bribe Case : मुंबईतील बोरीवली पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच तक्रारदाराला आणि त्याच्या दोन बहिणींना मदत करण्याच्या मोबदल्यात 1 लाख 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना PSI ज्ञानेश्वर पराडे याला ACBच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पराडे याने तक्रारदार आणि त्याच्या दोन बहिणींविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी सुरुवातीला 1 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. या मागणीमुळे तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई घटकाशी संपर्क साधत तक्रार दाखल केली.

तक्रार मिळाल्यानंतर ACBने तक्रारीची पडताळणी केली. या प्रक्रियेदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तडजोडीतून 1 लाख 30 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार ACBने सापळा रचून आरोपी पोलीस अधिकाऱ्याला पकडण्याची तयारी केली.

सोमवारी, 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी बोरीवली पोलीस ठाण्याच्या परिसरात ACBचे पथक तैनात होते. सायंकाळी 5 वाजून 42 मिनिटांनी ज्ञानेश्वर पराडे हा 1 लाख 30 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना पथकाने त्याला ताब्यात घेतले.

कारवाईनंतर ACBने आरोपीचा मोबाईल फोनही जप्त केला आहे. त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच आरोपीच्या निवासस्थानीही झडती घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलीस दलातील लाचखोरीच्या घटनांमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT