Shalarth ID Scam : 800 शिक्षकांच्या बनावट नियुक्त्या करत 160 कोटींचे अनुदान हडपणाऱ्या उपसंचालकाला उच्च न्यायालयाचा मोठा दणका

Maharashtra education department scam : बनावट शालार्थ आयडी घोटाळा राज्यभर चर्चेचा विषय आहे. या घोटाळ्यामुळे शिक्षण विभागावर भ्रष्टाचाराचा गंभीर शिक्का बसला आहे. यामध्ये संस्थाचालक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे संगणमत उघड झाले आहे. सुमारे 800 शिक्षकांना बनावट शालार्थ आयडी देण्यात आले.
Shalarth ID Scam | Bhausaheb Chavan
Shalarth ID Scam | Bhausaheb ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik News, 06 Oct : बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण दिवसेंदिवस गंभीर वळणावर जात आहे. यातील फरार उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्या अटकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात पोलिसांच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला.

बनावट शालार्थ आयडी घोटाळा राज्यभर चर्चेचा विषय आहे. या घोटाळ्यामुळे शिक्षण विभागावर भ्रष्टाचाराचा गंभीर शिक्का बसला आहे. यामध्ये संस्थाचालक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे संगणमत उघड झाले आहे. सुमारे 800 शिक्षकांना बनावट शालार्थ आयडी देण्यात आले. त्याद्वारे बनावट शिक्षण संस्था आणि नियुक्ती करून शासनाचे 160 कोटींचे अनुदान हडप करण्यात आले.

विशेष म्हणजे यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे नेतेही अडकले आहेत. या प्रकरणातील फरार शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण याला जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. अटक टाळण्यासाठी त्याने पोलिसांना गुंगारा देत फरार झाला. उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्याने अर्ज दाखल केला होता.

Shalarth ID Scam | Bhausaheb Chavan
MPSC Protest Pune : MPSC आंदोलन पेटले अन् पोलीस ॲक्शन मोडमध्ये : 29 क्लासेससह 51 विद्यार्थ्यांना नोटिसा; गुन्हे दाखल होणार?

सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या सुनावणीत चव्हाणला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने या प्रकरणात पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपसंचालक चव्हाण सातत्याने अटक टाळण्यासाठी विविध कायदेशीर अडथळे निर्माण करत होता.

Shalarth ID Scam | Bhausaheb Chavan
Gokul Election : गोकुळच्या एका जागेवरून शिवसेना-राष्ट्रवादीत घामासान : यड्रावकर गटाचा महायुतीत फुटबॉल

शिक्षण विभागात 2022 ते 2024 या कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील विविध १२ संस्था चालकांनी 160 कोटींच्या अनुदानाचा भ्रष्टाचार केला. यासंदर्भात बारा संस्थांसह विविध राजकीय नेते आणि मध्यस्तांच्या मार्फत ८०० हून अधिक शिक्षकांच्या बनावट नियुक्त्या करण्यात आल्या. यातील बहुतांशी नियुक्त्या उत्तर महाराष्ट्र आणि विशेषत: जळगाव जिल्ह्यात झाल्या.

या प्रकरणाचा मास्टर माईंड शिक्षण उपसंचालक चव्हाण असल्याचे पोलिसांचे निष्कर्ष आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून उपसंचालक चव्हाण फरार झाला आहे. गेल्या दोन आठवड्यात उच्च न्यायालयाने तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण कुवर, संस्थाचालक शरद शिंदे या दोघांचे देखील अटकपूर्व जामीन फेटाळले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com