Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal News : भुजबळ भाजपची अडचण वाढवणार..., मंत्रीपद धोक्यात ? वादग्रस्त विधान भोवणार..

Maharashtra Politics : "ही ब्राम्हण द्वेषाची लाट आहे," असे दवे म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai NCP News: राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबाबत केलेले वादग्रस्त विधान त्यांना भोवणार असल्याचे चिन्ह आहेत. त्यांच्याविरोधात ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे.

एका संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना ब्राह्मण समाजाबद्दल त्यांनी विधान केले आहे. "ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे ठेवत नाहीत," असे भुजबळ म्हणाले. त्यांच्या या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)

भुजबळ यांना अटक करावी, अशी मागणी केली जात असताना आता त्यांचे मंत्रीपद देखील धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे जोर धरत आहेत. भुजबळ भाजपची अडचण वाढवणार? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी बुधवारी नाशिक येथे भुजबळाच्या मतदार संघात आंदोलन केले. "भुजबळांबाबत आठ दिवसांत माफी मागितली नाही, तर मंत्रालयावर मोर्चा काढू अशा इशारा देखील दवे यांनी दिला आहे."ही ब्राम्हण द्वेषाची लाट आहे," असे दवे म्हणाले. राज्यभर त्यांच्याविरोधात होत असलेल्या आंदोलनामुळे त्यांचे मंत्रीपद धोक्यात येऊ शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

आपल्या विधानावर ठाम..

भुजबळ आपल्या विधानावर ठाम आहे. "कुठेही गेलो, तरी माझी भूमिका बदलणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांनी मुलामुलींना शिक्षण प्रवाहात आणले त्यांना पुजले पाहिजे यात कोणत्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नसल्याचे भुजबळ म्हणाले. मी कुठेही गेलो तरी फुले-शाहू-आंबेडकरांविषयीची भूमिका बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते छगन भुजबळ ?

ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे ठेवत नाहीत, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्याचबरोबर आम्ही कुठेही गेलो, तरी शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा अजिबात सोडणार नाही, असेही भुजबळ म्हणाले होते.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT